Bank Holiday in October 2023 : बँक हा सामान्य लोकांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खरं तर बँकांना दीर्घ सुट्ट्या असल्यास अनेक वेळा ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. सप्टेंबर महिना संपत आला असून, लवकरच नवीन महिना सुरू होणार आहे. भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत या काळात देशाच्या विविध भागांतील बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असतात. ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते. हेही वाचाः Money Mantra : UIDAI चार प्रकारचे आधार कार्ड करते जारी, त्यांच्यातील फरक जाणून घ्या ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, नवरात्री आणि दसऱ्यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI च्या यादीनुसार, ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण १५ दिवस बँका बंद राहतील. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही १५ दिवस सुट्टी असेल. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम हाताळताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुट्टीची यादी अगोदरच पाहून तुमच्या सुट्टीचे नियोजन करा. हेही वाचाः बायजू पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत, ४००० ते ५००० जणांना बसणार फटका ऑक्टोबरमध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहतील? १ ऑक्टोबर २०२३- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.२ ऑक्टोबर २०२३- गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.८ ऑक्टोबर २०२३- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.१४ ऑक्टोबर २०२३- महालयामुळे कोलकात्यात आणि दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.१५ ऑक्टोबर २०२३- रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.१८ ऑक्टोबर २०२३- गुवाहाटीमध्ये कटी बिहूमुळे बँका बंद राहतील.२१ ऑक्टोबर २०२३- दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना सुट्टी असेल.२२ ऑक्टोबर २०२३- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.२४ ऑक्टोबर २०२३- दसऱ्यामुळे हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.२५ ऑक्टोबर २०२३- गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.२६ ऑक्टोबर २०२३- गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये दुर्गा पूजा (दसई)/अॅक्सेशन डे बँका बंद राहतील.२७ ऑक्टोबर २०२३- गंगटोकमध्ये दुर्गापूजेला (दसई) बँका बंद राहतील.२८ ऑक्टोबर २०२३- कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.२९ ऑक्टोबर २०२३- देशभरात बँका बंद राहतील.३१ ऑक्टोबर २०२३- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल. बँक बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण करायचे? अनेक वेळा बँकांच्या सुट्ट्यांमुळे लोकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते, मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे लोकांचा हा त्रास कमी झाला आहे. आजकाल लोक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करतात. त्याच वेळी UPI देखील आजकाल ग्राहक मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.