How To Download mAadhaar App : अनेक कामांसाठी आधार कार्ड उपयोगी असले तरीही प्रत्येक ठिकाणी ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जाणे शक्य नसते. जर तुम्हाला फिजिकल कॉपी स्वरुपात आधार कार्डचा वापर करायचा नसल्यास अशावेळी mAadhaar अ‍ॅपचा वापर करू शकता. mAadhaar अ‍ॅपला तुम्ही सहज फोनमध्ये डाउनलोड करू शकता व याचा अगदी कुठेही गेल्यावर उपयोग करू शकता. mAadhaar ला ऑफलाइन मोडमध्ये अ‍ॅक्सेस करता येते आणि ओळखपत्राचा पुरावा दाखवायचा असताना तुम्ही mAadhaar उपयोग करू शकता.

आधार कार्ड आणि त्याच्याशी संबंधित सेवा अधिक सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी, UIDAI ने mAadhaar अ‍ॅप आणला आहे. या ॲपमध्ये युजर्सची आधार कार्डची माहिती डिजीटल स्वरूपात उपलब्ध असते. तसेच खास गोष्ट म्हणजे प्रवासात असताना तुम्ही यामध्ये सहज प्रवेश करू शकता. युजर्स त्यांच्या ॲपवर ३ प्रोफाइल जोडू शकतात. तसेच त्यांचे बायोमेट्रिक्स लॉक करणे, आधारसाठी त्यांचे ई-केवायसी ॲक्सेस करणे यासारख्या विविध सेवा देऊ शकतात.

तर आज आपण mAadhaar अ‍ॅप कसा डाउनलोड करायचा? त्याचे नक्की फायदे काय? या अ‍ॅपवर प्रोफाइल नक्की कसं बनवायचं, अ‍ॅपमध्ये पासवर्ड कसा रीसेट करायचा, प्रोफाइल तयार झालंय हे कसं बघायचं याबद्दल सविस्तर माहिती या बातमीतून जाणून घेऊया…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mAadhaar अ‍ॅप कसा डाउनलोड करावा? (How To Download mAadhaar App)

  • mAadhaar अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.
  • ‘mAadhaar’ अ‍ॅप शोधा.
  • mAadhaar UIDAI अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी ‘इंस्टॉल’ बटणावर क्लिक करा.
  • अ‍ॅप तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड झाल्यानंतर, तुम्हाला नोटिफिकेशन येईल.

mAadhaar अ‍ॅपवर प्रोफाइल कस बनवायचं? (How To Add Profile In mAadhaar App)

  • mAadhaar अ‍ॅपउघडा.
  • ‘Terms And Conditions’ ला सहमती द्या.
  • आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबरची माहिती लिहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • OTP लिहा आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • प्रोफाइल बनवण्यासाठी आधार कार्डवर नमूद केलेला क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. तुम्ही आधार क्रमांक देखील प्रविष्ट करू शकता.
  • पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रोफाइल तयार होईल.

mAadhaar अ‍ॅपमध्ये प्रोफाइल तयार झालंय हे कसं बघायचं? (How To View Profile In mAadhaar App)

  • mAadhaar अ‍ॅपमउघडा आणि लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
  • ‘My Profile’ किंवा ‘My Aadhaar’ पर्याय निवडा.
  • पिन एंटर करा
  • आता तुम्ही अ‍ॅपवर आधार क्रमांक, पत्ता, लिंग आणि नाव यासारखी माहिती पाहू शकता.
  • प्रोफाइलवर नमूद केलेले सर्व माहिती बरोबर आहेत का ते तुम्ही तपासू शकता. या पेजवर काही बदल देखील अपडेट केले जाऊ शकतात.

mAadhaar अ‍ॅपमध्ये पासवर्ड कसा रीसेट करायचा? (How To Reset Password Of mAadhaar App)

  • तुमच्या स्मार्टफोनवर mAadhaar अ‍ॅप उघडा.
  • ‘More’ वर क्लिक करा ; जे खालच्या उजव्या कोपऱ्यात आहे.
  • सेटिंग्जवर क्लिक करा.
  • ‘रेस्ट पासवर्ड’ निवडा.
  • नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला येईल.
  • पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पासवर्ड रीसेट करता येईल.

mAadhaar अ‍ॅप वापरण्याचे फायदे काय आहेत? (Benefits Of Using mAadhaar app)

  • mAadhaar अ‍ॅपवर आधार कार्डची माहिती सहजपणे मिळवता येतात. यामुळे सुरक्षितता वाढविण्यास मदत होते.
  • QR स्कॅनरच्या मदतीने पडताळणी प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते.
  • आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करता येतो.
  • eKYC प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते.
  • आधार कार्डवरील माहिती सहजपणे अपडेट करता येते.
  • ओरिजिनल आधार कार्ड बाळगण्याची आवश्यकता नाही.

mAadhaar अ‍ॅपमध्ये प्रोफाइल कसे डिलीट करायचे? (How To Delete Profile In mAadhaar App)

  • तुमच्या स्मार्टफोनवर mAadhaar अ‍ॅप उघडा.
  • प्रोफाइल पेज उघडा.
  • उजव्या कोपऱ्यात (वर) असलेले तीन ठिपके निवडा.
  • ‘Delete Profile’ निवडा.
  • पासवर्ड एंटर करा.
  • तुम्हाला प्रोफाइल का डिलीट आहे याचे कारण निवडा.
  • ‘Yes’ निवडा मग प्रोफाइल Delete केले जाईल.

mAadhaar तर अशाप्रकारे हे अ‍ॅप तुमच्या उपयोगी पडेल