Income Tax Return:नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाले आहे. याबरोबरच २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. यासाठी सीबीडीटीने ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या अंतर्गत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते. आता तुम्ही प्राप्तिकर भरू शकता किंवा जुन्या कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली अंतर्गत आयटीआर दाखल करू शकता. दोन्ही कर प्रणालींमध्ये कर स्लॅब वेगवेगळा आहे.
एकूण सात प्रकारचे ITR फॉर्म असतात
तुमच्यावर कर दायित्व आल्यास तुम्हाला ३१ जुलैपर्यंत आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरावे लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) फेब्रुवारीमध्ये ITR फॉर्म जारी केले होते. नोकरदार लोकांसाठी कंपन्यांकडून फॉर्म १६ ही जारी करण्यात आला आहे. यानंतर आयटीआर फाइल करणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढणार आहे. जसजसा ३१ जुलै जवळ येतो, तसतसे प्राप्तिकर वेबसाइटवरील ट्रॅफिक वाढत जाते. म्हणूनच तुम्ही वेळेवर ITR भरणे महत्त्वाचे आहे. वैयक्तिक प्राप्तिकर भरणारे, व्यवसाय आणि कंपन्यांसाठी सात प्रकारचे ITR फॉर्म आहेत.
हेही वाचाः भरती प्रक्रियेत लाचखोरी झाल्याचे आरोप TCS नं फेटाळले; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
दंड कधी लावला जाणार?
आवश्यकतेनुसार वेगवेगळे आयटीआर फॉर्म भरले जातात. ITR-1 आणि ITR-4 मोठ्या संख्येने लहान आणि मध्यम करदात्यांनी दाखल केले आहेत. मात्र, प्राप्तिकर भरणाऱ्यांनी मुदतीची काळजी घेतली नाही, तर त्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. यंदा ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. अशा परिस्थितीत जर कोणी ३१ जुलैपर्यंत ITR दाखल करू शकत नसेल तर त्याच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंत वेळ आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत उशिरा रिटर्न फाइलसह ITR दाखल करू शकता. यामध्ये तुम्हाला ५००० रुपये दंड भरावा लागेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ नंतर आयटीआर भरणाऱ्यांना ५००० रुपये दंड भरावा लागेल. यानंतरही जर देय तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर त्यानंतर आयटीआर दाखल करण्याची रक्कम दुप्पट होऊ शकते.
हेही वाचाः २००० च्या नोटेनंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती; काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?