मुंबई : भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, २ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात गंगाजळी ६७५ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. याआधी १९ जुलैला चलन गंगाजळीने ६७०.८५अब्ज डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती.

बाह्य वित्तपुरवठ्याच्या बाबतीतील गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार जून २०२४ पासून देशांतर्गत बाजारात निव्वळ खरेदीदार बनले आहेत. जूनच्या सुरुवातीपासून ६ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत ८१,४३३ कोटी रुपये म्हणजेच ९.७ अब्ज डॉलरची निव्वळ गुंतवणूक त्यांच्याकडून आली, तर त्याआधी एप्रिल आणि मे महिन्यात एकूण ४.२ अब्ज डॉलरचा निधी त्यांनी काढून घेतला आहे.

हेही वाचा : Gold Prices Falling : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण! लग्नासाठी सोने खरेदी करणाऱ्या जोडप्यांसाठी सुवर्णसंधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिल-मे २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर निव्वळ एफडीआय प्रवाह मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे, असे गव्हर्नर म्हणाले. भारतीय संस्थांकडून बाह्य वाणिज्य कर्जे कमी झाली आहे, मात्र त्या तुलनेत अनिवासी भारतीयांच्या ठेवी एप्रिल-मेमध्ये अधिक राहिल्या आहेत.