RBI annual report Indian economy : भारतातील केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज त्यांचा २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल जारी केला आहे. आरबीआयने जारी केलेल्या या रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून कायम राहिल असे म्हटले आहे.

आरबीआयने त्यांच्या वार्षीय रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सौम्य चलनवाढीची स्थिती आणि जीडीपीच्या वाढीच्या मध्यम गतीमुळे मॉनिटरी पॉलिसी येत्या काळात वाढीसाठी सहाय्यक असेल. तसेच आरबीआयने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था तिच्या मायक्रो इकॉनॉमिक्स बेसिक इंफ्रास्ट्रक्चर, मजबूत वित्तीय क्षेत्र आणि विकासाबद्दलची कायम असलेली वचनबद्धता याचा फायदा घेऊन २०२५-२६ मध्ये सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून कायम राहिल.

या रिपोर्टमध्ये, जागतिक वित्तीय बाजारपेठेतील अस्थिरता, भू-राजकीय तणाव, व्यापार विस्कळित होणे, पुरवठा साखळीत व्यत्यय येणे यासह हवामान बदलांशी संबंधित आव्हानांमुळे येणारी अनिश्चितता यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून नकारात्मक धोका आणि चलनवाढीच्या दृष्टीकेनातून सकारात्मक धोका असेल असे नमूद करण्यात आले आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, टॅरिफ धोरणामध्ये झालेल्या बदलामुळे आर्थिक बाजारपेठेत काही ठिकाणी अस्थिरता पाहायला मिळू शकते आणि निर्यातीची स्वकेंद्रीत धोरणे आणि व्यापार युद्धामुळे निर्यातीला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

आरबीआयने म्हटले आहे की, भारताने व्यापार करारावर स्वाक्षरी आणि वाटाघाटी केल्याने या परिणामांना मर्यादित ठेवण्याबाबत मदत मिळेल. तसेच सेवांची निर्यात तसेच इनवर्ड रेमिटन्स (Inward Remittances)मधून हे निश्चित करता येईल की नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच २०२५-२६ मध्ये करंट अकाउंट डेफिशियंट बऱ्यापैकी नियंत्रणात राहिल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरबीआयने यापूर्वी दोन वेळा प्रमुख रेपो दरांमध्ये कपात केली आहे. वार्षिक अहवालात सांगण्यात आले आहे की, १२ महिन्याच्या कालावधीत एकूण चलनवाढ ४ टक्क्यांचे लक्ष्य कायम ठेवेल अशी शक्यता जास्त आहे.