मुंबई : बाजार परिस्थितीनुरूप, लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे संतुलन साधणारा ‘फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड’ प्रस्तुत झाला असून, या समभागसंलग्न (इक्विटी) फंडात येत्या ८ जुलैपासून, २२ जुलैपर्यंत (एनएफओ) प्रति युनिट १० रुपयांनी गुंतवणूक करता येईल.

हेही वाचा : Stock Market: सेन्सेक्सची सर्वोच्च स्थानी झेप, ८० हजारांचा टप्पा पार; निफ्टीचीही विक्रमी घोडदौड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन दशकांहून अधिक काळ मालमत्ता व्यवस्थापनाचा अनुभव नवीन मल्टी कॅप फंडात प्रभावीपणे वापरात येईल, असे नमूद करीत फ्रँकलिन टेम्पल्टन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वंकष वाढीची क्षमता पाहता सर्व प्रकारच्या कंपन्यांना येथे प्रगती साधण्यास मोठी सुसंधी दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले. अशा लक्षणीय वाढीच्या क्षमता असलेल्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रवेशाची संधी ‘फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड’ सामान्य गुंतवणूकदारांना खुली करत असल्याचे त्यांनी सांगितले. फंडाची गुंतवणूक शैली ही वाढ आणि मूल्य अशा दोन्ही संकल्पनांचे मिश्रण करणारी असेल. आर. जानकीरमण, किरण सेबॅस्टियन, अखिल कल्लुरी आणि संदीप मनम (विदेशी समभाग) हे या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून काम पाहतील. ‘निफ्टी ५०० मिडकॅप ५०:२५:२५’ हा या फंडाचा मानदंड निर्देशांक असेल.