Google ची मूळ कंपनी Alphabet Inc ला भारतात Pixel स्मार्टफोनची निर्मिती करायची असून, यासाठी कंपनी पुरवठादार शोधत आहे. Google (Alphabet Inc) ने लावा इंटरनॅशनल लिमिटेड आणि डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपची भारतीय शाखा भारत FIH या देशी ब्रँडसह इतर कंपन्यांनी प्रारंभिक चर्चा सुरू केली आहे.

ज्या कंपन्या पीएलआय योजनेच्या लाभार्थी त्यांच्याशी वाटाघाटी

भारतात उत्पादन स्थलांतरित करण्यासाठी Google नवे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान स्पर्धेक असतील. Google ज्या संभाव्य भागीदारांशी चर्चा करीत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उत्पादन लिंक्ड फायनान्शियल इन्सेंटिव्ह (PLI) योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. मोदींच्या या योजनेमुळे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळते. Apple ने भारतातील PLI योजनेचा फायदा घेतला आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत iPhone उत्पादन क्षमता तिप्पट वाढवून ७ अब्ज डॉलरच्या वर नेली आहे.

हेही वाचाः विलीनीकरणापूर्वीच HDFC लिमिटेडचा मोठा निर्णय, शैक्षणिक कर्ज कंपनी HDFC क्रेडिलामधील ९० टक्के हिस्सा विकला

भारताला पर्यायी उत्पादन केंद्र बनवण्यासाठी पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून पुढे आणत आहेत, कारण बहुतेक कंपन्या चीनवर अवलंबून राहण्याच्या जोखमींपासून सावध आहेत. वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील व्यापार युद्ध वाढत आहे. त्यामुळेच मोदी असलेल्या अमेरिकेच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. शिष्टमंडळाने दोन्ही देशांमधील तांत्रिक व्यापारातील अडथळे दूर करण्यासारख्या विषयांवर चर्चा करणे अपेक्षित आहे.

हेही वाचाः सेबीची IIFL सिक्युरिटीजवर कडक कारवाई, शेअर्स १९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनी वैष्णव यांनी गुगलच्या सीईओची भेट घेतली

गेल्या महिन्यात भारताचे तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची कॅलिफोर्निया येथील माउंटन व्ह्यूमधील कंपनीच्या मुख्यालयात भेट घेतली, मोदींच्या स्थानिक उत्पादन मोहिमेला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीला चालन देण्यासाठीच त्यांनी भेट घेतली. या महिन्यात भारताला भेट देणार्‍या गुगलच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी आना कोरालेस आणि मॅगी वेई यांचा समावेश होता.