पीटीआय, नवी दिल्ली

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या उत्पादनावर इलेक्ट्रॉनिक भागांच्या टंचाईमुळे गंभीर परिणाम होत आहे. सुट्या भागांच्या पुरवठ्यातील अनिश्चितता कायम असून, चालू आर्थिक वर्षातही यामुळे उत्पादन घटू शकते, अशी शक्यता कंपनीने सोमवारी व्यक्त केली.

सरलेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक भागांच्या टंचाईमुळे मारुती सुझुकीच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. इलेक्ट्रॉनिक भागांच्या पुरवठ्यातील अनिश्चितता अद्याप कायम आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये वाहन उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – RBI’s Monetary Policy : रिझर्व्ह बँकेकडून आणखी पाव टक्का दरवाढ?

मागील आर्थिक वर्षात मारुती सुझुकीने १९.२२ लाख मोटारींचे उत्पादन केले, परंतु मागील आर्थिक वर्षात उत्पादनाचे २० लाखांचे उद्दिष्ट कंपनीला पूर्ण करता आले नाही आणि १ एप्रिलपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षातही हे उद्दिष्ट पुन्हा हुलकावणी देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

यंदा मार्च महिन्यात प्रवासी वाहने आणि हलक्या वाणिज्य वापराच्या वाहनांसह कंपनीचे एकूण उत्पादन १ लाख ५४ हजार १४८ इतके राहिले. मागील वर्षातील मार्चच्या तुलनेत त्यात ६ टक्क्यांची घसरण झाली असून, त्यावेळी उत्पादन १ लाख ६३ हजार ३९२ असे होते.

हेही वाचा – निर्मिती क्षेत्राची मार्चमध्ये जोमदार कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील महिन्यात एकूण प्रवासी वाहनांच्या उत्पादनात घट होऊन ते १ लाख ५० हजार ८२० वर आले. मार्च २०२२ मध्ये हे उत्पादन १ लाख ५९ हजार २११ होते. यंदा मार्च महिन्यात छोट्या आणि मध्यम आकाराच्या मोटारींचे उत्पादन १ लाख ८ हजार १, वाणिज्य वापराची वाहने २९ हजार ४४०, हलकी वाणिज्य वाहने ३ हजार ३२८ असे आहे.