मुकेश अंबानी आज ६६ वर्षांचे झाले आहेत. तसं पाहिलं तर त्यांनी निवृत्ती फार पूर्वीच घ्यायला हवी होती. पण आता त्यांनी आपल्या व्यवसायाच्या उत्तरार्धासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे. यात त्यांनी वडील धीरूभाई अंबानी यांनी मृत्यूपत्र न बनवल्याच्या चुकीतून धडा घेतला आहे. मुकेश अंबानींनी त्यांच्या ३ मुलांकडे विविध प्रकारचे व्यवसाय सोपवण्याची योजना आधीच तयार केली आहे. २००४ मध्ये मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यातील वाद तुम्हाला आठवत असेल. धीरूभाई अंबानी यांचं मृत्युपत्र नसल्यामुळे दोन्ही भावांमध्ये व्यवसायापासून ते मालमत्तेपर्यंत विभागणी झाली होती. आई कोकिलाबेन यांच्यासह आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व्ही. के. कामत यांना दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली. त्यामुळेच मुकेश अंबानी वाटणीची ही वेदना जवळून जाणतात.

वाटणीचे दुःख मुलांना द्यायचे नाही

मुकेश अंबानींना वाटणीचे दुःख त्यांच्या मुलांना ईशा, आकाश आणि अनंतला द्यायचे नाही. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी लग्नानंतर ७ वर्षे आई-वडील होण्याच्या आनंदापासून वंचित होते. त्यानंतर IVF च्या मदतीने १९९२ मध्ये त्यांना आकाश आणि ईशा जुळी मुले झाली आणि नंतर अनंत झाला, अनंत आता आता २८ वर्षांचा आहे. मुकेश अंबानी ५ किंवा ६ वर्षांपूर्वी निवृत्ती घेऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही, कारण तेव्हा त्यांची मुले रिलायन्ससारखा मोठा व्यवसाय हाताळण्यासाठी खूप लहान होती.

हेही वाचाः कॅपिटल गेन टॅक्समध्ये कोणताही बदल होणार नाही, प्राप्तिकर विभागाने अफवा फेटाळल्या

ईशा आणि आकाश यांच्यावर जबाबदारी आली

२०२२ मध्ये जेव्हा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले होते. त्याच वेळी त्यांनी कंपनीच्या भविष्यातील योजना किंवा त्याच्या उत्तराधिकाराच्या योजनेबद्दल माहिती दिली. नवीन पिढीमध्ये क्षमता आहे, त्यांना व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनवण्यावर आपण भर द्यावा, असे त्यांनी शेअर होल्डर्सना सांगितले. यासोबतच मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जर भविष्यात ईशा रिलायन्सचा रिटेल व्यवसाय सांभाळणार असेल, तर जिओ प्लॅटफॉर्मची जबाबदारी आकाशकडे असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज आपला ऊर्जा व्यवसाय नवीन ग्रीन एनर्जी व्यवसायात रूपांतरित करणार आहे आणि अनंत अंबानी त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत.

हेही वाचाः अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या पीछेहाटीचे अंदाज म्हणजे निव्वळ उतावीळ तर्क? उदय कोटक यांनी दिली सर्वाधिक उलाढालीच्या कंपन्यांची यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबानींकडून जगभरातील उत्तराधिकाराच्या मॉडेल्सचा देखील विचार

मुकेश अंबानी यांनी त्यांचा व्यवसाय आणि मालमत्तेच्या वाटपासाठी जगातील इतर कॉर्पोरेट घराण्यांच्या उत्तराधिकार योजनांचा अभ्यास केला आहे. एका अहवालानुसार, अंबानी कुटुंब एक ट्रस्ट तयार करून रिलायन्समधील आपली संपूर्ण होल्डिंग सोपवू शकते. हा ट्रस्टच व्यवसायावर नियंत्रण ठेवेल. या ट्रस्टमध्ये ते आणि पत्नी नीता यांच्याशिवाय तिन्ही मुले आणि त्यांच्या आयुष्यातील साथीदारांना भागीदार बनवता येईल, जेणेकरून भविष्यात भांडण होऊ नये. वॉलमार्ट इंकच्या वॉल्टन कुटुंबानेही असेच मालमत्तेचे वितरण केले आहे. डाबरच्या बर्मन कुटुंबाची कथाही अशीच आहे.