वाडिया समूहाच्या मालकीच्या बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (BDMC) ने बुधवारी वरळीतील २२ एकर जमीन ५२०० कोटी रुपयांना विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही जमीन जपानची कंपनी सुमितोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या गोईसू रियल्टी प्रायव्हेटला विकत असल्याचे बॉम्बे डाइंग कंपनीने म्हटले आहे. किमतीच्या दृष्टीने हा मुंबईतील सर्वात मोठा जमीन व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.

बॉम्बे डाइंग हा जमिनीचा व्यवहार दोन टप्प्यात पूर्ण करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीला गोईसू रियल्टीकडून ४,६७५ कोटी रुपये मिळतील, उर्वरित ५२५ कोटी रुपये बॉम्बे डाइंगच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मिळतील. विशेष म्हणजे कंपनी या रकमेचा वापर आपल्या ३९६९ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि रिअल इस्टेट प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी करेल, ज्यामुळे कंपनीचा ताळेबंद मजबूत होणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी ९०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे.

हेही वाचाः बँक ऑफ इंडियाने बाँड विकून २ हजार कोटी जमवले, शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी वाढले, पैसा कुठे वापरला जाणार?

बॉम्बे डाइंगचे कार्यालय दादर येथे स्थलांतरित

या जमिनीवर बॉम्बे डाइंगचे मुख्यालय ‘वाडिया इंटरनॅशनल सेंटर’ बांधण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात ते रिकामे झाले आणि कंपनीचे अध्यक्ष नुस्ली वाडिया यांचे कार्यालय तिथून हलवून बॉम्बे डाईंगच्या दादर येथील जागेत हलवण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे वाडिया मुख्यालयामागील प्रसिद्ध बास्टन रेस्टॉरंटही बंद करण्यात आले. महाराष्ट्राच्या मिल जमीन धोरणानुसार, बॉम्बे डाइंगने आपल्या दादर येथील आठ एकर जमीन पार्क किंवा मनोरंजनासाठी बीएमसीला दिली आहे. महाराष्ट्राच्या गृहनिर्माण प्राधिकरण ‘म्हाडा’ला ८ एकर जमीन देण्यात आली असून, तेथे सार्वजनिक गृहनिर्माण संस्था विकसित केली जाणार आहे.

हेही वाचाः देशात सर्वाधिक गुंतवणूक कुठून आली? भारतातून सर्वाधिक पैसा कोणत्या देशांमध्ये गेला? RBI च्या अहवालात महत्त्वाचे खुलासे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीएमसीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गिरणीची जमीन सरकारी संस्थांना देण्याच्या बदल्यात विकासकाला ८२,००० चौरस मीटर क्षेत्र विकसित करण्याचा अधिकार मिळेल. या परिसरात बांधल्या जाणाऱ्या घरांच्या इमारतींचा वापर गिरणी कामगारांच्या निवासासाठी आणि घरांच्या बांधकामासाठी केला जाणार आहे.