मुंबई : आयुर्वेद औषधांच्या निर्मितीमध्ये दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने अलीकडेच त्यांच्या सुवर्ण भस्म आणि सुवर्ण भस्म युक्त उत्पादनांच्या नवीन आधुनिक संशोधनातून, ‘स्वामला कंपाऊंड’ या उत्पादनाचे नव्याने अनावरण केले.

श्री धूतपापेश्वर लिमिटेडने १८ डिसेंबरला धातु सुवर्ण अर्थात् सोन्याच्या भस्मावर केल्या गेलेल्या आधुनिक संशोधनाविषयी माहिती दिली. अंतिम उपभोक्त्यापर्यंत पूर्णपणे मानकीकृत आणि सुरक्षित सुवर्ण भस्म पोहोचावे हे सुनिश्चित करण्यासाठी कंपनीकडून सखोल अनुसंधान करण्यात आले आहे. सुवर्ण भस्माच्या सुरक्षिततेसंबंधित अध्ययन हे नॅशनल सेंटर फॉर प्रीक्लिनिकल रिप्रॉडक्टिव्ह अँड जेनेटिक टॉक्सिकोलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव हेल्थ, मुंबई आणि आयआयटी पवई, मुंबई यासारख्या प्रतिष्ठित व प्रसिद्ध संस्थांकडून केले गेले आहे. हे अध्ययन जागतिक स्तरावर कौतुकास्पद, पीअर रिव्ह्यूड जर्नल्स् जसे टॉक्सिकोलॉजी जर्नल्स, जर्नल ऑफ इथनोफार्माकोलॉजी, जर्नल ऑफ एविडेंस बेस्ड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन सेज जर्नल्स, जर्नल ऑफ आयुर्वेद एंड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन इत्यादीमध्ये प्रकाशित झाले आहे. सुवर्ण युक्त उत्पादनापैकी एक वसंत कुसुमाकर रस, जे प्रमेहाच्या चिकित्सेमध्ये आयुर्वेद चिकिसकांद्वारे उपयोगात आणले जाणारे एक ग्रंथोक्त औषध आहे. त्यावरील अभ्यासाने नर्व्ह (नसा), किडनीसारख्या अवयवांवर होणाऱ्या दुष्परिणामांना थांबण्यासाठी सकारात्मक प्रभाव दिसून आला आहे. आयुर्वेद चिकित्सकाच्या देखरेखीमध्ये विशेषतः प्रमेहाच्या रुग्णांमध्ये याचा उपयोग करण्याचा सल्ला कंपनी देते.

हेही वाचा >>>Business Ideas : २५ व्यवसायाच्या आयडियांमधून निवडा तुम्हाला सोयीस्कर असा व्यवसाय अन् कमवा महिन्याला १ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने आपल्या प्रमुख उत्पादनांपैकी एक, स्वामला कंपाऊंडच्या नवीन उत्पादनाचे उद्घाटन या वेळी केले. हा सुवर्ण, रजत इत्यादी भस्मांनी समृद्ध च्यवनप्राश आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे उत्पादन बाजारपेठेत स्थापित आहे. स्वामला कंपाऊंड गायीचे शुद्ध तुप आणि मधाबरोबर उत्तम गुणवत्तायुक्त आवळे व अन्य वनस्पतीपासून तयार केले जाते. हे वर्षभर व प्रत्येक दिवशी सेवन केले जाणारे सर्वोत्तम असे प्राकृतिक पारिवारिक स्वास्थ्यवर्धक आहे. कंपनीच्या कार्याची दखल म्हणून कंपनीला भारताच्या तत्कालीन माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दोन वेळा नागार्जुन पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे.