यंदा देशातील रिटेल क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. रिलायन्स रिटेल, टायटन, ट्रेंट, शॉपर्स स्टॉप आणि आदित्य बिर्ला रिटेल यांसारखे देशातील मोठे किरकोळ विक्रेते(Retailers) यंदा त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत. देशातील महत्त्वाचे किरकोळ विक्रेते यंदा लवकरच नियुक्तीची प्रक्रिया सुरू ठेवणार आहेत आणि हे विशेषतः टियर १ आणि टियर २ शहरांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

किरकोळ विक्रेते (Retailers) नोकरी भरती का सुरू ठेवणार?

अहवालानुसार, किरकोळ कंपन्या भारतातील या क्षेत्राच्या वाढीच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास तयार आहेत. येत्या सणासुदीच्या काळात मोठ्या मागणीच्या अपेक्षेमुळे किरकोळ विक्रेत्यांना अधिक कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे आणि त्यामुळे त्यांना नवीन नोकऱ्यांच्या संधी वाढतील. याशिवाय रिटेल कंपन्यांच्या विस्तार योजनांमुळे दुकाने, मॉल्स, शोरूम आणि कार्यालयांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची गरज भासणार असून, त्यामुळे येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणतात की, जवळजवळ सर्व किरकोळ विक्रेत्यांना या क्षेत्रांमध्ये वाढीच्या संधी दिसत आहेत आणि ते नवीन कामाच्या संधी देत ​​आहेत, कारण कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यासाठी देखील वेळ लागेल.

हेही वाचाः Money Mantra : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर लाँच; गृह आणि वाहन कर्जांवर विशेष सूट

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, २० सूचीबद्ध लाइफस्टाइल आणि किराणा किरकोळ (Grocery Retails) आणि क्विक सेवा रेस्टॉरंट्स (Quick Service Restaurants)ने २०२३ या आर्थिक वर्षात सुमारे ६४,००० कर्मचाऱ्यांना त्यांनी काम दिले आहे आणि त्यांचे कार्यबल वाढवले ​​आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत यात सुमारे ७३ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय देशातील प्रमुख रिटेल कंपन्यांचा वार्षिक अहवाल आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये १४ टक्के वाढ केली आहे आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ते ५,३०,००० कर्मचारी वाढले आहेत. या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल शाखा, एव्हेन्यू सुपरमार्ट, शॉपर्स स्टॉप, जुबिलंट फूडवर्क्स, ट्रेंट, आदित्य बिर्ला रिटेल आणि टायटन यांसारख्या मोठ्या कंपन्यांची नावे आहेत.

हेही वाचाः …तर दररोज ५ हजार रुपयांचा दंड; आरबीआयने बँका, एनबीएफसींना दिले ‘हे’ आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यानं कर्मचाऱ्यांची गरज भासते

उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या मते, रक्षाबंधन आणि ओणम यांसारख्या सणांमध्येही किरकोळ कंपन्यांना चांगली मागणी आली आहे आणि या आधारावर असे म्हणता येईल की, किरकोळ विक्रेते तीव्र वसुलीचा लाभ घेऊ शकणार आहेत.