पुणे : पीएनजी ज्वेलर्सने त्यांचे नवीन उप-ब्रँड ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’चे मंगळवारी उद्घाटन केले. या ब्रँडच्या माध्यमातून कमी वजनाचे, डिझाईनकेंद्रित आणि दररोज वापरता येणारे दागिने सादर करण्यात आले आहेत.

याबाबत ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘लाइटस्टाईल’चे दागिने हे २५ ते ४० वयोगटातील स्त्रियांसाठी त्यांच्या स्टाईलचा खास भाग म्हणून हे डिझाईन करण्यात आले आहेत. कार्यालयीन बैठका, एखादा उत्सव आणि छोट्या खास प्रसंगांसाठी ‘लाइटस्टाईल’मध्ये कमी वजनाच्या, दर्जेदार आणि सहजपणे वापरता येतील अशा दागिन्यांचा समावेश आहे. ‘लाइटस्टाईल’ची दोन दालने खराडी आणि वाकड येथे सुरू होत असून, त्यांचे उद्घाटन २२ जूनला अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामागे सोन्याची वाढती किंमत, महिलांची प्रमुख खरेदीदार म्हणून तयार होत असलेली ओळख, तसेच आधुनिक जीवनशैलीस अनुरूप डिझाइनयुक्त आणि व्यावहारिक दागिन्यांची गरज हे घटक आहेत. आता दैनंदिन वापरात १४ आणि १८ कॅरेट सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर पसंतीस येत आहेत. ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ हा ब्रँड अशा वेगाने वाढणाऱ्या श्रेणीत प्रवेश करीत आहे, असे गाडगीळ यांनी नमूद केले.