पुणे : भारतातील विश्वासार्ह दागिने ब्रँड आणि १९२ वर्षांची परंपरा लाभलेल्या पीएनजी ज्वेलर्सने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खास योजना आणली आहे. १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणारी ही योजना आगामी सणोत्सव आणि लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना सोने खरेदी करताना आर्थिक दिलासा देण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे.
सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीचा विचार करून, ही मोहिम ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. देशातील आघाडीची सराफी पेढी असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने ग्राहकांसाठी ‘प्युअर प्राइस ऑफर’ मोहिमेची घोषणा केली आहे. योजनेअंतर्गत ग्राहकांना १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विद्यमान दराने आगाऊ सोने खरेदी अर्थात ‘प्री-बुक’ करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे भविष्यात सोन्याचा दर वाढला, तरीही त्यांना आधीच्या कमी दराचा लाभ मिळणार आहे.
शिवाय प्रत्यक्ष सोने खरेदीच्या वेळेस म्हणजेच ‘बिलिंग’ करतेवेळी सोन्याचा दर कमी असल्यास तो दर मान्य करून ग्राहकांना सोने विक्री केली जाणार आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे ग्राहक फायद्यात राहणार आहे, असे पीएनजी ज्वेलर्सने म्हटले आहे. या योजनेत ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे दागिने खरेदीसाठी देखील ही योजना लागू आहे.
ग्राहक आता किमतीतील चढ-उताराची चिंता न करता दागिन्यांच्या डिझाइन आणि खरेदीवर लक्ष केंद्रित करू शकतील. कारण भारतीय कुटुंबांसाठी सोने ही केवळ गुंतवणूक नसून भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वाची गोष्ट आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले. महाराष्ट्रातील पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना ग्राहकांचा ताण कमी करून सोने खरेदी अधिक सोपी आणि खात्रीशीर करते. त्यामुळे ग्राहक किंमतीतील चढ-उताराची चिंता न करता दागिन्यांच्या डिझाईन निवडण्यात लक्ष केंद्रित करू शकतात.
सौरभ गाडगीळ म्हणाले की, “प्युअर प्राइस ऑफर” च्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना पारदर्शक, निश्चिंत आणि फायद्याचा खरेदी अनुभव द्यायचा आहे. हीच ग्राहक आणि पीएनजी ज्वेलर्समधील विश्वासाची जोडणी आहे. या योजनेतून ग्राहकांसाठी उत्कृष्ट कारागिरी, पारदर्शकतेची खात्री आणि विश्वासासह उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी उत्सुकतेने पीएनजी ज्वेलर्स वाट पाहत आहे, असेही गाडगीळ म्हणाले.