RBI Action on Bajaj Finance : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बजाज फायनान्सवर मोठी कारवाई करत आर्थिक दंड ठोठावला आहे. बजाज फायनान्स लिमिटेड पुणे (महाराष्ट्र) वर ८.५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करून RBI ने बजाज फायनान्स लिमिटेडवर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ अंतर्गत कलम ५८ जीच्या उपकलम १ च्या कलम (ब) अंतर्गत आरबीआयला आर्थिक दंड आकारण्याचा अधिकार आहे. आरबीआयनं बजाज फायनान्स लिमिटेड पुणे (महाराष्ट्र) वर ८.५० लाख रुपये, युनियन बँकेवर १ कोटी रुपये आणि RBL बँक लिमिटेडवर ६४ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.

खरं तर आर्थिक नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे हा दंड लादण्यात आला आहे. तसेच कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा करारावर याचा परिणाम होणार नाही. हा आदेश १३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा असून, निर्बंध लावण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज आणि इतर निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी युनियन बँकेवर १ कोटींचा दंड ठोठावला आहे.

आरबीएल बँक लिमिटेडवरही आरबीआयची कारवाई

जारी आदेशात भारतीय रिझर्व्ह बँकेने RBL बँक लिमिटेडवर ६४ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे खासगी क्षेत्रातील या लोकप्रिय बँकेवर हा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. २०१५ मध्ये खासगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सच्या अधिग्रहणाशी संबंधित आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि मतदानाच्या अधिकारांची पूर्वमान्यता दिल्याबद्दल देशाच्या मध्यवर्ती बँकेने RBL बँकेवर हा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ४६ (४) (i) सह वाचलेल्या कलम ४७ अ (1) (सी) च्या तरतुदींनुसार RBI मध्ये निहित अधिकारांचा वापर करताना हा दंड लावण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

RBI ने युनियन बँक ऑफ इंडियावर मोठा आर्थिक दंडही ठोठावला

रिझर्व्ह बँकेने देशातील एका मोठ्या बँकेवर १ कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ४६ (४) (i) आणि ५१(१) सह वाचलेल्या कलम ४७ अ (१) (सी) च्या तरतुदींनुसार RBI ला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना हा दंड लावण्यात आला आहे. RBI ने युनियन बँक ऑफ इंडियावर हा दंड ठोठावला आहे, कारण बँकेने कर्ज आणि इतर निर्बंधबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही.