पीटीआय, बीजिंग

भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार वाढत असून सरलेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये तो १३५.९८ अब्ज डॉलर या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर या काळात दोन्ही देशांमधील व्यापार तूट अर्थात निर्यात-आयातीतील तफावतीने १०० अब्ज डॉलरपुढील पातळी गाठली आहे, अशी माहिती चीनच्या सीमा शुल्क सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी दिली.

वर्ष २०२१ मध्ये चीनसोबतचा एकूण व्यापार १२५.६२ अब्ज होता, जो वर्षभरात ४३.३२ टक्क्यांनी वाढून प्रथमच १०० अब्ज डॉलरच्या पार पोहोचला. भारत आणि चीनमध्ये डोकलाम, लडाखसह सीमेवर तणावाचे वातावरण असतानाही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये दिवसेंदिवस वाढ सुरूच असल्याचे ही आकडेवारी दर्शविते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उभयतांमधील २०२१ मधील १२५ अब्ज डॉलरच्या व्यापाराच्या तुलनेत २०२२ मधील वाढ ८.४ टक्क्यांची आहे. उल्लेखनीय म्हणजे चीनकडून भारताच्या आयात ११८.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी वर्षभरात २१.७ टक्क्यांनी वाढली आहे. तर भारतातून चीनला होणारी निर्यात ३७.९ घटून १७.४८ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. यामुळे भारताची व्यापार तूट १०१.०२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वर्ष २०२१ मध्ये तुटीने ६९.३८ अब्ज डॉलरची पातळी नोंदवली होती.