पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचा लिलाव पुन्हा एकदा घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) याला गुरुवारी परवानगी दिली. यामुळे कर्जदात्यांच्या गटाला इच्छुक कंपन्यांकडून अधिक चांगली बोली येईल, अशी अपेक्षा आहे.

उद्योगपती अनिल अंबानी हे रिलायन्स कॅपिटलचे प्रवर्तक आहेत. एकत्रित ४०,००० कोटी रुपये इतका प्रचंड मोठा कर्जभार असलेली ही कंपनी असून, तिच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) या दिवाळखोर कंपनीच्या प्रकरणी लिलावाची प्रक्रिया आणखी लांबवण्याला प्रतिबंध करणारा आदेश दिला होता. या विरोधात देणेकरी व कर्जदात्यांच्या गटातील विस्ट्रा आयटीसीएल (इंडिया) या कंपनीने एनसीएलटीकडे धाव घेतली होती.

हेही वाचा – मेट्रो विरुद्ध ‘आपली बस’; काय आहे राजकारण?

हेही वाचा – नागपूर : मारहाण करून प्रेयसीवर बलात्कार

रिलायन्स कॅपिलटच्या आधी झालेल्या लिलावात सर्वाधिक ८,६४० कोटी रुपयांची बोली टोरेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीने लावली होती. मात्र, देणेकऱ्यांच्या गटाने पुन्हा लिलाव घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी हिंदुजा समुहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (आयआयएचएल) कंपनीने सुधारित बोली लावली होती. याला टोरेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीने एनसीएलटीच्या खंडपीठासमोर आव्हान दिले होते. यावर खंडपीठाने लिलाव प्रक्रिया संपुष्टात आल्याचे सांगितले होते. या निर्णयाला नंतर आयआयएचएलनेही आव्हान दिले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance capital reauction nclat permission to the company group of lenders ssb
First published on: 03-03-2023 at 09:37 IST