पीटीआय, नवी दिल्ली

निवृत्तिवेतन नियामक मंडळ अर्थात ‘पीएफआरडीए’च्या अध्यक्षपदी एस. रमन यांची नियुक्ती केली आहे. रमन हे विद्यमान वर्षातील मे २०२५ मध्ये दीपक मोहंती यांची जागा घेतील. एस. रमन हे उपनियंत्रक आणि महालेखापरीक्षक अधिकारी आहेत.

केंद्राच्या नियुक्ती समितीने (एसीसी) उपनियंत्रक आणि महालेखापरीक्षक असलेले शिवसुब्रमण्यम रमन यांची पीएफआरडीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. एसीसीने पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते ६५ वर्षे वयापर्यंत पूर्ण होईपर्यंत त्यांची नियुक्ती मंजूर करण्यात आली आहे. सध्या उपनियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमन हे लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयए अँड एएस) या १९९१ च्या तुकडीतील आहेत. वर्ष २०२१ ते २०२४ दरम्यान त्यांनी ३ वर्षे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सिडबी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. सिडबीमध्ये येण्यापूर्वी ते नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी रमन २०१५-२०१६ दरम्यान झारखंड, रांची येथील प्रिन्सिपल अकाउंटंट जनरल (ऑडिट) होते. त्यांनी २००७ ते २०१३ दरम्यान भांडवली बाजार नियामक सेबीमध्ये कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले.