मुंबई : साधव शिपिंगने मुंबई बंदरापासून ते ओएनजीसीच्या ऑफशोअर सुविधांदरम्यान नव्याने अधिग्रहित जलद जहाज “साधव अनुषा”द्वारे कर्मचारी वृंदासाठी जलवाहतूक सेवा सुरू केली आहे. एनएसई इमर्ज बाजारमंचावर सूचीबद्ध कंपनीने हे जहाज ६४ कोटी रुपयांना खरेदी केले असून, सरकारी मालकीची तेल कंपनी ओएनजीसीशी पाच वर्षांसाठी केलेल्या कराराचे एकत्रित मूल्य सुमारे १५० कोटी रुपयांचे आहे.

हेही वाचा >>> खासगी-सरकारी बँकांचा एकत्रित नफा विक्रमी ३ लाख कोटींवर; आर्थिक वर्षातील कामगिरीचे पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक

ओएनजीसीने मुंबई हायमधील विविध तेल उत्खनन प्लॅटफॉर्म आणि ड्रिलिंग रिग्सवरून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बंदरापासून वाहतूक सेवा सुरू केली आहे आणि अशा प्रकारची सेवा प्रदान करणारी साधव अनुषा ही पहिलीच फेरी बोट आहे. १९९६ मध्ये स्थापित, मुंबईस्थित साधव शिपिंगची सागरी व्यापाराच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वमालकीच्या आणि कार्यान्वयन सुरू असलेली २४ हून अधिक जहाजे आहेत.

हेही वाचा >>> स्टेट बँक नव्या अध्यक्षांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारीमध्ये कंपनीचे समभाग प्रारंभिक समभाग विक्रीने तब्बल १३४ पटींहून अधिक भरणा मिळविणारा प्रतिसाद मिळविला होता. कंपनीने या माध्यमातून ३८.१८ कोटी रुपये उभे केले आहेत. एनएसई इमर्ज मंचावर कंपनीचे समभाग ४२ टक्के अधिमूल्यासह प्रत्येकी १३५ रुपये किमतीला त्यावेळी सूचिबद्ध झाले होते. शुक्रवारी (१८ मे) समभागाचा भाव प्रत्येकी २४६.४० रुपयांवर बंद झाला होता.