भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ICICI बँकेच्या MD म्हणून संदीप बक्षी यांची पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने सोमवारी सांगितले की, RBI ने संदीप बक्षी यांची तीन वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास हिरवा कंदील दिला आहे.

संदीप बक्षी पुढील ३ वर्षांसाठी ICICI बँकेचे MD राहतील

संदीप बक्षी यांची ICICI बँकेचे MD म्हणून ३ वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. सेंट्रल बँकेच्या मंजुरीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ICICI बँकेने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की, बक्षी यांची पुनर्नियुक्ती ४ ऑक्टोबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रभावी असेल. त्यात म्हटले आहे की, बँकेच्या भागधारकांनी आधीच बक्षी यांच्या नियुक्तीला आणखी तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे.

हेही वाचाः विश्लेषण: निफ्टी २० हजारांच्या पार, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चिंता नाही

संदीप बक्षी यांचे आयसीआयसीआय ग्रुपशी नाते

संदीप बक्षी १ डिसेंबर १९८६ रोजी ICICI समूहाच्या प्रकल्प वित्तपुरवठा विभागात सामील झाले आणि रिटेल बँकिंग आणि लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायासाठी जबाबदार होते. एप्रिल २००२ मध्ये त्यांची ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती झाली.

हेही वाचाः रिलायन्स समूहाच्या ‘या’ कंपनीचे मूल्यांकन ८ लाख कोटींच्या पुढे, आता KKR करोडोंची गुंतवणूक करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात खासगी क्षेत्रातील सामान्य विमा ऑफरचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या तीन वर्षांत ते कोणते नवीन काम करणार हे पाहायचे आहे. आज ICICI बँक लिमिटेडचे ​​शेअर्स ७.८० रुपये म्हणजेच ०.८० टक्क्यांच्या वाढीसह बीएसईवर ९७८.३५ रुपयांवर बंद झाले.