मुंबई : अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदराबाबत आक्रमक भूमिका कायम ठेवत थेट अर्ध्या टक्क्याची वाढ केली, त्याचे गुरुवारी जगभरातील भांडवली बाजारावर नकारात्मक पडसाद उमटले. देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी एक टक्क्याहून मोठी पडझड झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्‍‌र्हने (फेड) व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्क्यांपर्यंत वाढवून १५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर नेला आहे. या घडामोडीची भांडवली बाजारात सर्वाधिक झळ निर्यातीवर निर्भर माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना बसली. परिणामी गुरुवारच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८७८ अंशांची घसरण झाली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा हा निर्देशांक ८७८.८८ अंशांनी म्हणजेच १.४० टक्क्यांनी घसरून ६१,७९९.०३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ९६२.३ अंश गमावत ६१,७१५.६१ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टीमध्ये २४५.४० अंशांची म्हणजेच १.३२ टक्क्यांची घसरण झाली आणि तो १८,४१४.९० पातळीवर स्थिरावला

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

‘फेड’ने मागील खेपेप्रमाणे पाऊण टक्क्यांऐवजी व्याजदरात अर्ध्या टक्क्याची वाढ केली असली तरी तिच्या आक्रमक पवित्र्याने सर्वानाच चकित केले आहे. अमेरिकेत महागाईचा दर अपेक्षेपेक्षा अधिक नरमल्याने ‘फेड’कडून व्याजदर वाढीबाबत सौम्य भूमिका घेतली जाण्याची अपेक्षा होती. बरोबरीने ‘फेड’ने जागतिक मंदीची शक्यता व्यक्त केली असल्याने, त्या परिणामी देशांतर्गत आघाडीवर माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केला. आता गुंतवणूकदार गुरुवारी सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या युरोपियन सेंट्रल बँकेच्या पतधोरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्याकडून देखील व्याजदरात अर्धा टक्के वाढीची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टेक मिहद्र, टायटन, इन्फोसिस, एचडीएफसी, आयटीसी, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस आणि स्टेट बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर केवळ एनटीपीसी आणि सन फार्मा यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.

रुपयात २७ पैशांची घसरण

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून गुरुवारच्या सत्रात रुपया २७ पैशांनी घसरून ८२.७६ पातळीवर स्थिरावला. फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार समभाग विक्रीचा मारा केल्यामुळे आणि इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने त्याची परिणती रुपया घसणीत झाली. परकीय चलन विनिमय मंचावर, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८२.६३ या कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८२.४१ ही उच्चांकी तर ८२.७७ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता.