पुणे : आघाडीची लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सुईमुक्त इंजेक्शन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या इंटिग्रीमेडिकलमधील २० टक्के भागभांडवल संपादित केल्याचे शुक्रवारी घोषित केले. सुईमुक्त इंजेक्शनच्या माध्यमातून वेदनारहित आणि तणावमुक्त पद्धतीने शरीरामध्ये द्रवरूप औषध देऊन उपचार करता येतात.

हेही वाचा >>> विकास दर ७ टक्क्यांवर जाणार – संयुक्त राष्ट्र, ०.४ टक्क्यांच्या वाढीसह सुधारित अनुमान

इंटिग्रीमेडिकलने सुईविना इंजेक्शन प्रणाली विकसित केली आहे, जी यांत्रिक शक्तीचा वापर करून औषधांचे प्रभावीपणे आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीकडून हा व्यवहार किती रुपयांना पार पडला याबाबत मात्र माहिती दिलेली नाही.

सुई टोचण्याची भीती वाटणाऱ्या रुग्णांसाठी तणावमुक्त अनुभव प्रदान करून वेदना कमी करणे हे या तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे लशींचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल घडवून आणू असा विश्वास सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केला.

Story img Loader