वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य इंजिन असलेल्या सेवा क्षेत्राची चक्रे मंदावली आहेत. सेवा क्षेत्राच्या सक्रियतेने जानेवारी महिन्यात गेल्या वर्षातील जानेवारीनंतरचा सर्वांत कमी वेग नोंदविल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक जानेवारी महिन्यात ५७.९ गुणांवर नोंदला गेला. ही निर्देशांकाची नोव्हेंबर २०२३ नंतरची नीचांकी पातळी आहे. याआधी डिसेंबरमध्ये हा गुणांक ५९.२ होता. हा निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तारपूरक आणि ५० गुणांखाली असल्यास त्यामध्ये आकुंचन झाल्याचे मानले जाते. हा निर्देशांक २०१३ च्या मध्यापासून ५० गुणांवर राहिला आहे.

सेवा क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा आहे. या क्षेत्राची गती मंदावल्याने विकास दराला फटका बसणार आहे. सरकारनेही चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज ६.४ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. सेवा क्षेत्रात घसरण होत असताना निर्मिती क्षेत्राचा पीएमआय ५८ गुणांवर नोंदला गेला आहे. ही ६ महिन्यांतील उच्चांकी पातळी ठरली आहे. याचवेळी सेवा क्षेत्राचा पीएमआय घसरून होऊन ५९.३ गुणांवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील निर्मिती क्षेत्राची नवीन वर्षात भक्कम सुरुवात झाली आहे. उत्पादनासह नवीन कार्यादेशात वाढ होताना दिसत आहेत. याचबरोबर कच्च्या मालाची महागाई कमी झाली असून, निर्यातीतही वाढ होत आहे. – प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया