मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या जून महिन्यात त्यायोगे आजवरची सर्वोच्च २७,२६९ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. भांडवली बाजारात अस्थिरतेचे वातावरण असूनही किरकोळ गुंतवणूकदारांकडून ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक कायम आहे, अशी म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था ‘ॲम्फी’ने बुधवारी माहिती दिली.
‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, मे महिन्यात झालेल्या २६,६८८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा सरलेल्या जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये २.२ टक्के वाढ आहे. जून महिन्याअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही वाढून ९.१९ कोटींवर पोहोचली आहे. जी मे महिन्यात ९.० कोटी नोंदवली गेली होती. म्हणजेच सरलेल्या महिन्यांत एकूण १३ लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांची भर पडली.. या महिन्यात ६२ लाख नवीन एसआयपी नोंदणी झाल्या होत्या, तर ४८ लाख खाती बंद झाली किंवा त्यांची मुदत झाली. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि विक्रमी योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढती विश्वासार्हता निदर्शनास येते.
जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या मासिक गुंतवणुकीने नवीन उच्चांक गाठला आहे. ‘एसआयपी’च्या खात्यांमधील व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १४.६१ लाख कोटी रुपयांवरून १५.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘एसआयपी’ एयूएमचे म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत २०.६ टक्के योगदान आहे, जे मे महिन्यामध्ये २०.२ टक्के होते.
म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या काही महिन्यांनंतर ‘एसआयपी स्टॉपेज रेशो’ अर्थात एसआयपी बंद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात एसआयपीच्या टक्केवारीनुसार स्टॉपेज रेशो ५६.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो मे २०२५ मध्ये सुमारे ७२ टक्के आणि एप्रिलमध्ये जवळजवळ ३०० टक्के होता.
‘इक्विटी’मधील ओघ वाढला
सलग पाच महिन्यांच्या घसरणीनंतर इक्विटी फंडांमध्ये नक्त वाढ झाली आहे. इक्विटी फंडांतील निव्वळ आवक डिसेंबरमध्ये ४१,१५६ कोटी रुपयांवरून जानेवारीमध्ये ३९,६८८ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये २९,३०३ कोटी रुपये, मार्चमध्ये २५,०८२ कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये २४,२६९ कोटी रुपयांवर सतत घसरली. या घसरणीपूर्वी, नोव्हेंबरमध्ये आवक ३५,९४३ कोटी रुपये होती. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण निव्वळ व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ७४.४१ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली, जी मेमध्ये ७२.२० लाख कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये ६९.९९ लाख कोटी रुपये होती. मेमध्ये इक्विटी फंडामध्ये २२ टक्के घट झाल्यानंतर, जूनमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमधील आवक २४ टक्क्यांनी वाढली असून,ती २३,५८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मुख्यतः ओपन-एंडेड इक्विटी योजनांमध्ये निव्वळ गुंतवणूक सुरू राहिल्याचा हा सलग ५२ वा महिना राहिला आहे.
‘एसआयपी’चा वाढता प्रवाह म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांच्या शिस्तबद्ध सहभागाचे प्रतिबिंब आहे. जूनमधील गुंतवणूक एक संभाव्य वळणबिंदू आहे, जो भारतीय भांडवली बाजारावरील आत्मविश्वास आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढती जोखीम घेण्याची क्षमता अधोरेखित करतो.हिमांशू श्रीवास्तव, मॅनेजर रिसर्च, मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडिया म्हणाले की सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ची सततची ताकद