Share Market Opening 7 August, 2025 : जगभरात निर्माण झालेला भूराजकीय तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्यासंदर्भात केलेल्या घोषणेचा मुंबई शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं दिसत आहे. आठवड्यातील चौथ्या दिवशी देशांतर्गत भांडवली बाजाराची ४२३ अंकांनी (०.३५ टक्के) घसरण झाली आहे. यासह शेअर बाजार ८०,१२० अंकांवर व्यवहार करत आहे. दुसऱ्या बाजूला एनएसईच्या निफ्टी निर्देशांकांत ११०.०० अंकांची (०.४५ टक्के) घसरण झाली आहे. निफ्टी आज २४,४६४ अंकांवर उघडला.
अमेरिकेने भारतावर लादलेल्या २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. तर, काही तासांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर आणखी २५ टक्के आयात शुल्क लावणार असल्याची घोषणा केली आहे.
बजाज होल्डिंग्स व पिडिलाइटचे शएर्स वधारले
भारतीय भांडवली बाजारातील व्यवहार सुरू होताच अनेक कंपन्यांच्या समभागांची घसरण सुरू झाली. बजाज होल्डिंग्स (४.३९ टक्के),पिडिलाइट (२ टक्के), हिरो मोटर्स (१ टक्का), बजाज फिनसर्व्ह (०.३२ टक्के), आयटीसी (०.११ टक्के), एचडीएफसी बँक (०.०४) च्या समभागांमध्ये वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला सिएट १.२१ टक्के, टाटा मोटर्स १.४९ टक्के आणि टाटा स्टीलची ०.८२ टक्क्यांनी घसरण झाली
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
बाजारातील व्यवहार सुरू होताच अदानी पोर्ट्सचे समभाग ०.९७ टक्के, इटरनल ०.८४ टक्के, एसबीआय ०.८२ टक्के, ट्रेंट ०.६४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.६१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.५७ टक्के, एशियन पेंट्स ०.५३ टक्के, बीईएल ०.५१ टक्के, बजाज फायनान्स ०.४३ टक्के, एल अँड टी ०.४३ टक्के, भारती एअरटेल ०.४१ टक्के, एचसीएल टेक ०.३४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३४ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३२ टक्के, एनटीपीसी ०.३० टक्के, टीसीएस ०.२९ टक्के, इन्फोसिस ०.१९ टक्के, सन फार्मा ०.१८ टक्के, टेक महिंद्रा ०.१३ टक्के, टायटन ०.१३ टक्के, पॉवर ग्रिड ०.११ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ०.०४ टक्क्यांनी घसरले.
निफ्टीमधील हिरो मोटर्स, ट्रेंट, विप्रो, आयटीसी व नेस्ले इंडियाच्या शेअर्सचा भाव वधारला आहे. तर, टाटा मोटर्स, इटर्नल, कोटक बँक, अदाणी एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स घसरले आहेत.