मुंबई: सोमवारी सलग पाचव्या दिवशी भांडवली बाजारातील तेजीसह, ‘सेन्सेक्स’ २८१ अंशांनी वधारला, वित्तीय, ऊर्जा तसेच निरंतर घरंगळत आयटीसीच्या समभागांत वाढलेल्या खरेदीने ‘निफ्टी’ने नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला. अस्थिर सुरुवात करूनही मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ २८१.५२ अंश (०.३९ टक्के) वाढून ७२,७०८.१६ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी १७ समभागांचे मूल्य वाढले, तर निर्देशांकाने दिवसाच्या व्यवहारात ७२,८८१.९३ असा उच्चांक नोंदवला. दुसरीकडे निफ्टीने शुक्रवारच्या बंदच्या तुलनेत ८१.५५ अंशांची (०.३७ टक्के) कमाई करून २२,१२२.२५ अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर दिवसअखेरीस विश्राम घेतला. उल्लेखनीय म्हणजे निफ्टी निर्देशांकांने २०२४ सालात आतापर्यंत सहाव्यांदा नवीन उच्चांकाला गाठणारी कामगिरी केली आहे. निफ्टीने २२,१८६.५५च्या दिवसांतर्गत व्यवहारातील विक्रमी स्तराला गवसणी घातली. या निर्देशांकातील ५० पैकी तब्बल २७ समभागांनी मूल्यवाढ अनुभवली.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 19 February 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याची उंच उडी, मुंबई-पुण्यात ‘इतक्या’ वाढल्या किमती

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

सेन्सेक्सच्या सोमवारच्या कमाईत, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, सन फार्मा, मारुती सुझुकी, आयटीसी आणि नेस्ले या समभागांची योगदानांत आघाडी राहिली. दुसरीकडे, एल अँड टी, विप्रो, इंडसइंड बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्स हे समभाग घसरले. जोखीम-लाभ गुणोत्तर अनाकर्षक बनावे इतकी बाजार मूल्यांकन चढलेले असतानाही, खासगी क्षेत्रातून भांडवली विस्तार आणि गुंतवणुकीत दिसून येत असलेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी लोकसभा निवडणुकांनंतर राजकीय स्थैर्याबद्दलच्या आशावादाने गुंतवणूकदारांनी सकारात्मक दृष्टिकोनासह खरेदी सुरू ठेवली आहे, असे सातत्यपूर्ण तेजीची कारणमीमांसा जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी केली.

हेही वाचा >>> ‘सीआरआर’चा भार कमी करण्यासाठी बँकिंग अग्रणीचा घोषा ; हरित ठेवींसाठी विशेष तरतुदीचे स्टेट बँकेचे रिझर्व्ह बँकेला आर्जव

अपेक्षेप्रमाणे राहिलेली कंपन्यांची तिमाही कामगिरी, प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या कमाईत आलेली स्थिरता आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील वाढते खरेदी स्वारस्य यामुळे एकंदर मूल्यांकन चढे असतानाही खरेदीच्या भावना सकारात्मक असल्याचे दिसून येते. देशांतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि देशी संस्थांकडून सुरू राहिलेला निरंतर गुंतवणूक प्रवाहाने बाजार निर्देशांकांतील आगेकूच कायम राखली आहे, असे निरीक्षण मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख (रिटेल) सिद्धार्थ खेमका यांनी नोंदवले.