मुंबई : जागतिक पातळीवरील कमकुवत कल आणि देशांतर्गत आघाडीवर निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाल्याने सेन्सेक्सने ५३५ अंश गमावले. बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात बाजारात घसरण झाली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३५.८८ अंशांनी घसरून ७१,३५६.६० बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ५८८.५१ अंश गमावत ७१,३०३.९७ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४८.४५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,५१७.३५ रुपयांवर स्थिरावला.

stock market update sensex gains 114 pts nifty settles above 22400
Stock Market Today: जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’ची शतकी दौड
pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान

हेही वाचा >>> ‘बजाज ऑटो’ची समभाग पुनर्खरेदीसाठी ८ जानेवारीला बैठक

समभागांचे वाढलेले मूल्यांकन आणि बाजाराला चालना देणाऱ्या वृत्ताच्या अभावाने गुंतवणूकदारांना अलिप्त राहण्यास भाग पाडले. चीनमधील घसरता विकासवेग, यूरोझोनमधील उत्पादन आकडेवारीतील आकुंचन आणि त्या परिणामी वर्ष २०२४ मध्ये जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीबद्दल चिंता वाढली आहे.भांडवली बाजार अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीबाबत मिळणाऱ्या संकेताच्या प्रतीक्षेत आहे. अमेरिकी १० वर्षे मुदतीच्या रोखे उत्पन्नातील वाढ आणि डॉलर निर्देशांक वधारल्याने ‘फेड’कडून पुन्हा व्याजदर वाढ लांबण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टेक महिंद्र, इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नेस्ले, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचडीएफसी बँक आणि मारुती यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर इंडसइंड बँक, आयटीसी, भारती एअरटेल आणि स्टेट बँकेचे समभाग सकारात्मक राहिले.

जिओ फायनान्शियलचा सेबीकडे म्युच्युअल फंड परवान्यासाठी अर्ज

जिओ फायनान्शियल-ब्लॅकरॉक मॅनेजमेंटने म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवली बाजार नियामक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) अर्ज केला आहे. संयुक्त उपक्रमाअंतर्गत कंपन्यांनी तत्वतः मान्यतेसाठी सेबीकडे १९ ऑक्टोबर२०२३ रोजी अर्ज दाखल केले होते.
याचबरोबर अबिरा सिक्युरिटीजने म्युच्युअल फंड परवान्यासाठी पुन्हा अर्ज केला आहे. वर्ष २०१२ मध्ये स्थापन झालेली अबिरा सिक्युरिटीज ही कोलकाता येथील भांडवली बाजार दलाली संस्था आहे. अबिराने यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये म्युच्युअल परवान्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, एंजेल वन लिमिटेडला गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्वतः मान्यता देण्यात आली होती, मात्र अंतिम नोंदणीची मंजुरी नियामकाकडे विचाराधीन आहे. सध्या, देशात ४५ म्युच्युअल फंड घराणे कार्यरत असून त्या ५० लाख कोटी रुपये मालमत्तेचे व्यवस्थापन करतात.