पीटीआय, नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सुमारे १४ कोटी डॉलरच्या (अंदाजे १,१६६ कोटी रुपये) दंडात्मक नुकसान भरपाईच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. परिणामी कंपनीच्या आधीच ताण आलेल्या मिळकतीला या इतक्या रकमेचा भुर्दंड विद्यमान तिसऱ्या तिमाहीअखेर सोसावा लागण्याची चिन्हे आहेत.

विस्कॉन्सिन जिल्हा न्यायालयाने एपिक सिस्टीम कॉर्पोरेशनच्या बाजूने निकाल देत त्यांना १४ कोटी कोटी डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. टीसीएसने २००९ मध्ये भारतातील मोठ्या हॉस्पिटल शृंखलांसाठी लागू करण्यात आलेल्या रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली ‘मेड मंत्रा’च्या विकासित करताना बौद्धिक संपदा नियमांचे उल्लंघन करण्यात आले. टीसीएसने एपिक सिस्टीमच्या यूजर-वेब पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा एपिकचा आरोप होता. त्यावर २० नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने विस्कॉन्सिन जिल्हा न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत एपिक सिस्टीम कॉर्पोरेशनच्या बाजूने निकाल दिला.

हेही वाचा : आठवड्यात सहा ‘आयपीओ’ गुंतवणूकदारांना अजमावणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घडामोडीची टीसीएसकडून शेअर बाजारांना अधिकृतरित्या माहिती दिली गेली. अमेरिकी न्यायालयाच्या आदेशानंतर, कंपनीला ३१ डिसेंबर २०२३ अखेर सरणाऱ्या तिसऱ्या तिमाहीत ‘अपवादात्मक बाब’ म्हणून तिच्या ताळेबंदामध्ये या १,६६६ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करावी लागणार आहे. मंगळवारच्या सत्रात याचा नकारात्मक परिणाम म्हणून टीसीएसचा समभाग ०.२६ टक्क्यांनी घसरून ३,५१०.३० रुपयांवर स्थिरावला.