पुणे : टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनल यांनी पुण्यामध्ये जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे नाव ‘रिवायर’ (रिसायकल विथ रिस्पेक्ट) असून, या अत्याधुनिक केंद्रात वर्षाला २१ हजार वाहने भंगारात काढता येतील. याआधी देशात जयपूर, भुवनेश्वर, सुरत, चंडीगड आणि दिल्ली अशा पाच ठिकाणी रिवायर सुविधा असून, आता महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यात ती सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण नाही : अर्थमंत्रालय

पुणे जिल्ह्यात संतोषनगर, वाकी (ता. खेड) येथे ही सुविधा आहे. या ठिकाणी सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांना भंगारात काढता येईल. या सुविधेचे उद्घाटन करताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, टाटा मोटर्स गतिशीलतेच्या भविष्याला आकार देण्यामध्ये अग्रस्थानी आहे. ‘रिवायर’च्या माध्यमातून चक्रीय अर्थव्यवस्था निर्माण करण्यासोबत प्रगत पुनर्वापर प्रकियांचा फायदा घेण्याचा उद्देश आहे. त्यामुळे जुन्या वाहनांमधून अधिक मूल्य मिळेल. याचबरोबर देशाच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टात योगदानही देता येईल.

हेही वाचा >>> उत्पादन क्षेत्राची वाढ ११ महिन्यांच्या नीचांकी; किंमतवाढीच्या दबावाने घटलेल्या कार्यादेशांचा फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी टाटा इंटरनॅशनलची उपकंपनी टाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लिकेशन्सचे (टीआयव्हीए) मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बात्रा म्हणाले की, टीआयव्हीए आणि टाटा मोटर्सने देशातील वाहनांच्या जीवनचक्राच्या दृष्टिकोनामध्ये परिवर्तन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या केंद्रातून वर्षाला २१ जुनी वाहने भंगारात काढता येतील. सुरक्षित वाहन पुनर्वापराच्या वाढत्या गरजेची पूर्तता करण्याच्या हेतूने केंद्राची रचना करण्यात आली आहे.