scorecardresearch

Premium

मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीला दिला ‘नवरत्न’चा दर्जा, यादीत आता १४ नावांचा समावेश

Modi government Navaratna status : ONGC Videsh Ltd ही कंपनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवली जाते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल ११,६७६ कोटी होती आणि निव्वळ नफा १७०० कोटी होता.

Modi government Navaratna status
मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीलाही दिला 'नवरत्न'चा दर्जा

ONGC Videsh gets Navratna status : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ओएनजीसी विदेश लिमिटेडला ‘नवरत्न’चा दर्जा दिला आहे. ONGC विदेश पहिल्यांदा श्रेणी I ‘मिनीरत्न’मध्ये होती, परंतु मंत्रालयाच्या मंजुरीनंतर तिला आता थेट ‘नवरत्न’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE)मध्ये सामील करण्यात आले आहे. CPSE च्या यादीत ONGC विदेश ही १४वी नवरत्न कंपनी ठरली आहे. ONGC Videsh Ltd ही कंपनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवली जाते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल ११,६७६ कोटी होती आणि निव्वळ नफा १७०० कोटी होता.

नवरत्न होण्यासाठी कंपनीला आधी मिनीरत्न दर्जा मिळवावा लागतो. याबरोबरच त्यांच्या संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालक असणेही आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनीने बाजारमूल्य, निव्वळ नफा, एकूण उत्पादन खर्च, मनुष्यबळ खर्च, सेवा खर्च, PBDIT यांसारख्या अनेक पॅरामीटर्समध्ये १०० पैकी ६० गुण मिळवणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, ONGC विदेश कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४१,०३९ कोटींची उलाढाल आणि ९८५४ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

Nissan Magnite AMT Kuro edition unveiled
Nexon, Brezza चा खेळ संपणार? देशात आली नवी SUV कार, १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल २७ किमी, किंमत फक्त…
iphone 12 base varient buy 32,999 on flipkart big billion days sale 2023
Flipkart Big Billion Days Sale 2023: अ‍ॅपल कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन ३२,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असणार, जाणून घ्या
RBI
…तर दररोज ५ हजार रुपयांचा दंड; आरबीआयने बँका, एनबीएफसींना दिले ‘हे’ आदेश
mukesh ambani Reliance industries
रिलायन्स समूहाच्या ‘या’ कंपनीचे मूल्यांकन ८ लाख कोटींच्या पुढे, आता KKR करोडोंची गुंतवणूक करणार

हेही वाचा: Money Mantra : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच…

‘नवरत्न’ कंपन्यांच्या यादीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एमटीएनएल, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, एनबीसीसी, एनएमडीसी, रेल विकास निगम लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचाः सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद, गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले

सार्वजनिक उपक्रम विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. सध्या देशात १३ महारत्न कंपन्या आहेत. बुधवारी ‘ऑइल इंडिया’ला महारत्नाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ONGC Videsh ला नवरत्न दर्जा दिल्यानंतर देशात १४ नवरत्न कंपन्या (Navratna CPSE) झाल्या आहेत. मिनीरत्न I CPSE श्रेणीमध्ये एकूण ६२ कंपन्यांचा समावेश आहे. मिनीरत्न II CPSE यादीमध्ये एकूण ११ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The modi government also conferred navaratna status on one more state owned ongc videsh company taking the list to 14 names vrd

First published on: 04-08-2023 at 10:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×