मुंबई : स्मॉल फायनान्स बँक म्हणून सूक्ष्म वित्त कार्यरत ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँके’च्या समभागांनी शुक्रवारी शेअर बाजारात पदार्पणालाच दमदार ९२ टक्क्यांची मुसंडी मारली.उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे समभाग गुंतवणूकदारांना प्रत्येकी २५ रुपये किमतीला वितरित केले गेले, त्याबदल्यात शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात या समभागांत ३.९५ रुपये (५९.८ टक्के अधिमूल्यासह) किमतीला प्रारंभिक व्यवहार झाला आणि ४७.९४ रुपयांचा उच्चांकही त्याने अल्पावधीत दाखविला.

दिवसअखेर समभाग वितरीत किमतीच्या तब्बल ९१.७६ टक्क्यांनी उंचावत ४७.९४ रुपयांवर स्थिरावला. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी १०१ पटीने अधिक भरणा करून उमदा प्रतिसाद दिला. विद्यमान वर्षातील पहिल्या सहामाहीत प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी गुंतवणूकदारांना भरभरून लाभ मिळाला आहे.उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने २०१७ पासून कार्य सुरू केले. आता भांडवली बाजारात एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक या इतर लघु वित्त बँकांमध्ये आता उत्कर्ष स्मॉल फायनान्सचे नव्याने पदार्पण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

GAURAV MUTHE