Nithin Kamath Warning : ऑनलाइन ब्रोकिंग फर्म Zerodha चे CEO आणि सह संस्थापक नितीन कामत यांनी लोकांना एका नवीन फसवणुकीबद्दल इशारा दिला आहे. कामत यांनी एक व्हिडीओ शेअर करून खोटे लोक तुमची अन् तुमच्या कंपनीची बदनामी करण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत हे सांगितले. एका व्यक्तीने झिरोधाचा बनावट कर्मचारी असल्याचे दाखवून ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. आता नितीन कामत यांनी झिरोधाच्या ग्राहकांना अशा कोणत्याही दाव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

बक्षिसाच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करण्याचा प्रयत्न

कामत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका व्यक्तीनं क्लायंटला सांगितले की, त्याला बक्षीस मिळाले आहे. तुम्ही नोंदणी शुल्क म्हणून १.८ लाख रुपये भरल्यास तुम्हाला ५ कोटी रुपये मिळतील. तो ग्राहकाला भेटला आणि त्याला झिरोधा बँक खात्याची बनावट स्टेटमेंट दाखवली, ज्यात १० कोटी रुपये आहेत. सुदैवाने ग्राहकाने झिरोधाशी संपर्क साधला आणि फसवणूक करणाऱ्याला पैसे दिले नाहीत. कंपनीने सर्व ग्राहकांना अशा प्रकारची फसवणूक आणि दाव्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचाः आता ई-सिमचे युग येणार का? ‘या’ मोठ्या कंपनीच्या सीईओंनी दिले संकेत

लोकांनीही बनावट क्लोन अ‍ॅप्सपासून सावध राहावे

गुंतवणूकदारांना सावध करत कामत म्हणाले की, आजकाल काही लोक बनावट क्लोन अॅप्सच्या मदतीने नफा-तोटा स्टेटमेंट, लेजर आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या बँक खात्यांचे व्हिडीओ बनवत आहेत. हे लोक बनावट स्क्रीनशॉटसह व्हिडीओ देखील वापरतात. कंपनीने यासंदर्भात एक व्हिडीओही जारी केला आहे. यामध्ये हे लोक यशस्वी ट्रेडिंग आणि अधिक नफा मिळविण्याचे मार्ग कसे दाखवतात हे कळते. विशेष म्हणजे हे बनावट असल्याचे कामत सांगतात. तुम्हाला बनावट क्लोन अॅप्सवर बनवलेल्या व्हिडीओंपासून सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचाः Money Mantra : कार्ड टोकनायझेशनमुळे तुमच्या गोपनीयतेला धोका नाही, जाणून घ्या कसे कार्य करते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीमंत अमेरिकन लोकांना भारतात गुंतवणूक करायची आहे

नितीन कामत म्हणाले की, सध्या माझ्या ओळखीचे बहुतांश अमेरिकन गुंतवणूकदार भारतात पैसे गुंतवण्यास तयार आहेत. पण अमेरिकेचे भविष्य घडवण्यासाठी भारतीय तरुण देश सोडून तिथे जात आहेत. हा एक प्रकारचा विरोधाभास आहे.