सोन्यात गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित मानले जाते. कारण सोन्याचा भाव वर्षानुवर्षे वाढतच जाते. आता त्याची किंमत ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेली आहे. त्यामुळेच आता प्रत्येकाला सोन्यात काही तरी गुंतवणूक करायची इच्छा असते. बऱ्याचदा आपण एखाद्या चांगल्या योजनेत रक्कम गुंतवण्याचा पर्याय निवडतो, परंतु आज काळ बदलला आहे आणि एखादी व्यक्ती अगदी कमी रुपयेही सोन्यात गुंतवू शकते. सोन्यात गुंतवणूक करण्याचे असेच चार मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF)

जर तुम्हाला शेअर्सप्रमाणेच लहान रकमेसह सोन्यात नियमितपणे गुंतवणूक करायची असेल, तर गोल्ड ईटीएफ हा एक चांगला पर्याय आहे. हे लिक्विड असून, शेअर्सप्रमाणे खरेदी आणि विक्री करता येतात. यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

गोल्ड ईटीएफचे फायदे

युनिट विकल्यावर तुम्हाला सोन्याच्या बाजार दरानुसार पैसे मिळतात.
गोल्ड ईटीएफच्या मदतीने तुम्ही सोने खरेदी-विक्री सहज करू शकता.
सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सर्वात स्वस्त आणि चांगला पर्याय आहे.

हेही वाचाः Navil Noronha : देशातील सर्वात श्रीमंत सीईओ नवील नोरोन्हा; मुंबईत ७० कोटींचे घर अन् पगार जाणून थक्क व्हाल

पेमेंट अॅपद्वारे सोन्यात गुंतवणूक करा

तुम्ही फक्त एका क्लिकवर डिजिटल पेमेंट अॅप्सद्वारे सोन्यात सहज गुंतवणूक करू शकता. सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सोपा मार्ग आहे. विशेष म्हणजे येथे तुम्ही अगदी कमी रकमेची गुंतवणूक करू शकता.

पेमेंट अॅप्सद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचे फायदे

यामध्ये तुम्ही एक रुपयाचीही गुंतवणूक करू शकता.
ज्वेलरी मेकिंगचे कोणतेही शुल्क नाही.
तुम्हाला त्यात फिजिकल सोन्यासारखी सुरक्षित ठेवण्याची काळजी नसते.

सॉवरेन गोल्ड बाँड

सॉवरेन गोल्ड बाँड हे सरकारी रोखे आहेत. ते वेळोवेळी आरबीआयकडून जारी केले जातात. त्याचे युनिट एक ग्रॅम आहे. त्यातील एक ग्रॅमचे मूल्य एक ग्रॅम सोन्याच्या किमतीएवढे आहे. त्यात गुंतवलेल्या रकमेवर सरकार दरवर्षी २.५० टक्के व्याज देते.

हेही वाचाः बँक एफडीत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, ‘या’ बँका देत आहेत ९ टक्के व्याज

सॉवरेन गोल्ड बाँडचे फायदे

सॉवरेन गोल्ड बाँड्समधील गुंतवणूक २४ कॅरेट सोन्यात केली जाते.
त्यात गुंतवलेल्या रकमेवर व्याज दिले जाते.
सॉवरेन गोल्ड बाँड सरकारद्वारे जारी केले जातात. यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.

फिजिकल सोने

फिजिकल सोन्यात गुंतवणूक करण्याचा पारंपरिक मार्ग आहे. जर तुम्ही दागिने खरेदी करत असाल तर ते ठीक आहे, परंतु तज्ज्ञ फिजिकल सोने खरेदी करणे ही गुंतवणूक मानत नाहीत. ते खरेदी करताना तुम्हाला जीएसटी आणि मेकिंग चार्जेस इत्यादी भरावे लागतील. जर तुम्हाला सोन्यात मोठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती बिस्किटे किंवा नाण्यांच्या स्वरूपात करू शकता.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold has reached the mark of 60000 in five years get benefits by investing in these four ways vrd
First published on: 26-03-2023 at 12:40 IST