Gold-Silver Rates Today: भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मजबूत जागतिक ट्रेंडदरम्यान बुधवारी सराफा बाजारात १० ग्रॅम सोने महाग झाले आणि ६१,०८० रुपयांवर पोहोचले. यासह सोन्याने नवा उच्चांक गाठला. एक किलो चांदीच्या दरातही वाढ झाली असून, आता त्याची ७५,७८० रुपयांना विक्री होत आहे, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढून ६१,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ६०,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

आज चांदीचा भाव किती?

तसेच चांदीचा भावही ८४० रुपयांनी वाढून ७५,७८० रुपये प्रति किलोवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, “दिल्लीतील स्पॉट सोन्याच्या किमती ३३० रुपयांनी मजबूत झाल्यामुळे प्रति १० ग्रॅम ६१,०८० रुपयांवर गेल्या आहेत .”

परदेशी बाजारात सोन्याची घसरण

परदेशी बाजारात सोने आणि चांदी अनुक्रमे २०११ डॉलर प्रति औंस आणि २५.१७ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करीत होते.

हेही वाचाः मोठ्या खासगी बँकेने FD वरचे व्याज वाढवले, जाणून घ्या नवे दर

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या

विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवे दर पाहू शकता.

हेही वाचाः १० दिवसांत बँक FD पेक्षाही ५ पट परतावा; विजय केडियाच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ शेअर चांगलाच वधारला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारीमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढली

महत्त्वाचे म्हणजे चीन आणि मध्य पूर्व बाजारपेठांमधील मागणीत सुधारणा झाल्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढून २८,८३२.८६ कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात २३,३२६.८० कोटी रुपये होती.