Elon Musk : इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या टेस्लाचे सीईओ तथा स्पेसएक्स आणि ‘एक्स’चे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मात्र, आता एलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलिनियर बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास ५०० अब्ज डॉलरपेक्षा पुढे गेली आहे. एलॉन मस्क यांनी मार्क झुकरबर्ग आणि अमेझॉनचे जेफ बेझोस यांनाही मागे टाकलं आहे.
टेस्लाच्या शेअरच्या किमतीत अचानक वाढ देखील झाली आहे.दरम्यान, एलॉन मस्क यांनी हा नवा विक्रम केला असल्यामुळे ते एवढे श्रीमंत व्यक्ती कसे बनले? असं अनेकदा म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवर आता एलॉन मस्क हे त्यांचे अर्धा ट्रिलियन डॉलर्स नेमकं कसे खर्च करतात? याबाबत अनेकांना उत्सुकता नक्कीच असेल. त्यामुळे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
राजकीय खर्च
एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये कार्यक्षमता विभागाचे प्रमुख (DOGE) म्हणून काही काळ काम पाहिलेलं आहे. तसेच २०२४ च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देत पक्षाच्या मोहिमेसाठी २८८ दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याचं सांगितलं जातं. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेला पुढे नेण्यासाठी मस्क यांनी अमेरिका पीएसीची स्थापना केली होती.डिसेंबर २०२४ मध्ये त्यासाठी ११.२ दशलक्ष डॉलर्सचं योगदान देण्यात आलं. अमेरिकेतील सात सर्वात मोठ्या राज्यांमध्ये या संस्थेचे ५००० हून अधिक घरोघरी प्रचारक काम करत होते. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
धर्मादाय संस्थांना देणगी
ट्रम्प यांच्या प्रचाराव्यतिरिक्त एलॉन मस्क यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून रोख रकमेद्वारे अनेक धर्मादाय संस्थांना देणग्या दिल्या आहेत. तसेच मस्क यांच्या फाउंडेशनने स्पेसएक्स लाँच साइट असलेल्या कॅमेरॉन काउंटीला २० दशलक्ष डॉलर्स देणगी देण्याची घोषणा केली. तसेच शाळांना भरपाई देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. ब्राउन्सविले शहराला १० दशलक्ष डॉलर्स देणगी देण्यात आली होती.
ट्विटरचं नाव बदलून एक्स केलं
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ट्विटरचं नाव बदलून एक्स असं करण्यात आलं. या संदर्भातील कराराला २०२२ मध्ये एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर एलॉन मस्क यांनी हळूहळू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि एआय Grok लाँच केलं. हे एआय स्टार्टअप सॅम ऑल्टमनच्या ChatGPT चे थेट स्पर्धक मानलं जातं होतं आणि आता त्याची किंमत जवळजवळ £५५ अब्ज आहे.
गल्फस्ट्रीम जेट्सचे मालक
डोनाल्ड ट्रम्प, मुकेश अंबानी, किम कार्दशियन आणि इतर अब्जाधीशांच्या यादीत आता एलॉन मस्क हे सर्वात श्रीमंत खासगी विमान मालकांपैकी एक आहेत. मस्क हे प्रत्येकी ७० दशलक्ष डॉलर किमतीच्या दोन गल्फस्ट्रीम जेट्सचे मालक आहेत.
