Maharashtra FDI FY 2024-25 Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. अशातच परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र गुजरातच्या पुढे आहे. ही बातमी समाजमाध्यमांवर शेअर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे, तसेच महाराष्ट्रीय जनतेचं अभिनंदन केलं आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अतिशय आनंदाची बातमी! देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२,४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra FDI) झाली आहे. मागील दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
Devendra Fadnavis on CM face
Devendra Fadnavis on CM face: “शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचं नाव शिजतंय”, देवेंद्र फडणवींसाचं मोठं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना..”
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

वेगवेगळी राज्ये व त्यांना मिळालेली परकीय गुंतवणूक

महाराष्ट्र – ७०,७९५ कोटी रुपये
कर्नाटक – १९०५९ कोटी रुपये
दिल्ली – १०,७८८ कोटी रुपये
तेलंगणा – ९०२४ कोटी रुपये
गुजरात – ८५०८ कोटी रुपये
तामिळनाडू – ८,३२५ कोटी रुपये
हरयाणा – ५८१८ कोटी रुपये
उत्तरप्रदेश – ३७० कोटी रुपये
राजस्थान – ३११ कोटी रुपये

Maharashtra FDI
फडणवीस यांनी जाहीर केलेली आकडेवारी (PC : Devendra Fadnavis X)

हे ही वाचा >> Madhabi Puri Buch : माधवी पुरी बुच यांच्याविरोधात सेबी कर्मचारी आक्रमक; निदर्शने करत राजीनामा देण्याची केली मागणी

इतर राज्यांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात : फडणवीस

फडणवीस यांनी म्हटलं आहे की “या सर्व राज्यांमधील परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra FDI) आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७०,७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात १,१८,४२२ कोटी, (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती?.

उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही ५ वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे…