निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात खरेदी सपाटा, नवीन परदेशी निधीचा ओघ आणि जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक कल यामुळे प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारच्या सत्रात एक टक्क्याची उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२९.०७ अंशांनी म्हणजेच १.०२ टक्क्यानी वधारून ६२,५०१.६९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६५७.२१ कमाई करत ६२,५२९.८३ अंशांची सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येदेखील १७८.२० अंशांची वाढ (०.९७) झाली आणि तो १८,४९९.३५ पातळीवर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पातळीवरील मंदीचे सावट असूनही भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीच्या अंदाजामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीचे वातावरण होते. चौथ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील विकासदर आधीच्या अंदाजित सात टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सामान्य मान्सूनची अपेक्षा आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण खरेदीमुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळावला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग २.७९ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील आणि टायटन या कंपन्यांचे समभाग वधारले. तर भारती एअरटेल, पॉवर ग्रीड आणि एनटीपीसीच्या समभागांत घसरण झाली.

हेही वाचाः एकेकाळी हॉटेल रिसेप्शनिस्ट होते अन् बुटांच्या कारखान्यातही केले काम, आज १२७०० कोटींचा हॉटेल व्यवसाय, कोण आहेत मोहन सिंग?

रिलायन्सचे बाजार भांडवल १६.९५ लाख कोटींवर

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी शुक्रवारी जवळपास तीन टक्क्यांनी झेप घेतली. परिणामी कंपनीच्या बाजार भांडवलात ४५,८८७.८ कोटी रुपयांची भर पडली. रिलायन्सचा समभाग दिवसअखेर २.७९ टक्क्यांनी वधारून २,५०६.५५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे बाजार भांडवल ४५,८८७.८ कोटींनी वाढून १६,९५,८३३.६५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

हेही वाचाः २००० ची नोट मागे घेणे हा चलन व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग; RBIची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती

सेन्सेक्स ६२,५०१.६९ ६२९.०७ (१.०२)
निफ्टी १८,४९९.३५ १७८.२० (०.९७)
डॉलर ८२.५८ -१४
तेल ७६.४४ ०.२४

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 percent bounce in indices sensex up 630 degrees vrd
First published on: 26-05-2023 at 18:50 IST