मुंबई: दुचाकी आणि तीनचाकी बनवणारी आघाडीची कंपनी असलेल्या बजाज ऑटोचे बाजारभांडवल (मार्केट कॅपिटल) प्रथमच दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बजाज ऑटोच्या शेअरने सकाळच्या सत्रात ६ टक्क्यांची उसळी घेत ७,४२० रुपयांचा सर्वोच्च उच्चांक गाठला.

गेल्या एका वर्षात, बजाज ऑटोच्या शेअरने १०५ टक्क्यांची तेजी अनुभवली आहे. तर या काळात बीएसई ऑटो इंडेक्स ४३ टक्क्यांनी वधारला.

शेअरमधील तेजीचे कारण काय?

कंपनीच्या संचालक मंडळाने बजाज ऑटोचे समभाग प्रत्येकी १०,००० रुपयांना बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून एकूण ४० लाख समभाग खरेदी केली जाणार आहे. जाहीर झालेली ‘बायबॅक’ किंमत सुमारे ४३ टक्के फायदा देणारी आहे.

बजाज ऑटो ही जगातील तिसरी सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक आहे. कंपनीच्या एकूण महसुलात निर्यातीचा वाटा आर्थिक वर्ष २०१० मधील २८ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १.६ अब्ज डॉलरसह ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास २० लाख दुचाकींची निर्यात कंपनीने जगातील ७० हून अधिक देशांमध्ये केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बजाज ऑटोने प्रसिद्ध ‘चेतक’ला इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा बाजारात आणले. जी विद्युत दुचाकींच्या क्षेत्रात पुन्हा चांगली कामगिरी करत बजाज ऑटोची या क्षेत्रातील सत्ता टिकवून ठेवण्यास मदतकारक ठरेल. शिवाय कंपनीने विद्युत तीन चाकीदेखील (इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर) बाजारात आणली असून सरलेल्या वर्षात ५.८१ तीन चाकी वाहनांची विक्री केली. पुण्यातील चेतक टेक्नॉलॉजी प्रकल्पामध्ये विद्युत तीन चाकी वाहनाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांसाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.