जिथे जगभरात बँकिंग क्षेत्राची अवस्था वाईट आहे. त्याच वेळी केवळ खासगीच नाही तर सरकारी बँकादेखील भारतात प्रचंड नफा कमावत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत १३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत बँकेने ८४० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. जर आपण बँकेचे आकडे बरोबर पाहिले तर बँकेचे निव्वळ उत्पन्न ३५ टक्क्यांनी वाढून केवळ व्याजातून २,१८७ कोटी रुपये झाले आहे. मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या याच तिमाहीत ते १,६१२ कोटी रुपये होते. त्यावेळी बँकेला ३५५.२ कोटींचा नफा झाला होता.

बँकेचा एनपीए कमी झाला

या काळात बँकेची बुडीत कर्जे कमी झाली आहेत. त्यामुळे बँकेचा एकूण NPA त्याच्या एकूण कर्जाच्या २.४७ टक्के आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. तेव्हा बँकेचा ग्रॉस एनपीए २.९४ टक्के होता. त्याचप्रमाणे बँकेचा NPA सुद्धा ०.२५ टक्क्यांवर आला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत तो ०.४७ टक्के होता.

हेही वाचाः इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ इतका महत्त्वाचा का? तुम्हाला तो कुठून मिळेल?, सगळी माहिती एका क्लिकवर

NPA साठी राखून ठेवलेली रक्कम

या कालावधीत बँकेने बुडीत कर्जासाठी रकमेची तरतूद वाढवली आहे. ते ९४५ कोटी रुपये आहे, जे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील ५८२ कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा ६२ टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत तो ३६५.४ कोटी रुपये होता. या तुलनेत सध्याची रक्कम १५८ टक्के अधिक आहे.

हेही वाचाः VPF मध्ये पीएफपेक्षा जास्त फायदा, मोठी रक्कम हातात येणार अन् कर सूटही मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक प्रत्येक शेअरवर १३% लाभांश

बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळानेही त्यांच्या भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर बँकेकडून १३ टक्के म्हणजेच १.३ रुपये लाभांश दिला जाईल. यासोबतच बँकेच्या बोर्डाने कर्ज आणि इक्विटीमधून ७५०० कोटी रुपये उभारण्याची परवानगीही दिली आहे.