भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच हाँगकाँगला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार, सोमवारी भारतीय एक्सचेंजेसवर सूचीबद्ध शेअर्सचे एकत्रित मूल्य ४.३३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते. तर हाँगकाँगसाठी हा आकडा ४.२९ ट्रिलियन डॉलर होता. यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारात पैसा ओतला

५ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजाराचे मार्केट कॅप प्रथमच ४ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले. यापैकी सुमारे २ ट्रिलियन डॉलर गेल्या चार वर्षांत आले. किरकोळ गुंतवणूकदाराच्या मजबूत कॉर्पोरेट कमाईमुळे भारतातील समभागही वेगाने वाढत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाने चीनला पर्याय म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भारतीय बाजारपेठ आता जागतिक गुंतवणूकदार आणि कंपन्यांकडून नवीन भांडवल मिळवण्यासाठी आकर्षित करीत आहे.

हेही वाचाः अंबानी कुटुंबाने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी घेतला सहभाग, मंदिरासाठी ‘एवढ्या’ कोटींची दिली देणगी

“भारतातील वाढीसाठी सर्व गोष्टी योग्य आहेत,” असे मुंबईतील अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता यांनी सांगितले. भारतीय शेअर्समधील सततची वाढ आणि हाँगकाँगमधील ऐतिहासिक घसरण भारताला या टप्प्यावर घेऊन गेली आहे. बीजिंगचे कठोर कोविड १९ निर्बंध, कॉर्पोरेशनवरील नियामक कारवाई, मालमत्ता क्षेत्रातील संकट आणि पाश्चिमात्य देशांबरोबरचा भू-राजकीय तणाव यामुळे जगाच्या वाढीचे इंजिन म्हणून चीनच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. चिनी आणि हाँगकाँगच्या समभागांचे एकूण बाजार मूल्य २०२१ मध्ये त्याच्या सर्वोच्च शिखरापासून ६ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे.

हेही वाचाः राम मंदिरासंदर्भातील अमूलचे डूडल व्हायरल, १ लाखांहून अधिक लाइक्स अन् कमेंट्स

हाँगकाँगने स्वतःचे स्थान गमावले

हाँगकाँगमध्ये कोणतीही नवीन लिस्टिंग होत नाहीये. आयपीओ हबसाठी जगातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणून त्यांनी आपले स्थान गमावले. काही रणनीतीकार बदलासाठी आशावादी आहेत. नोव्हेंबरच्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये चिनी समभाग भारतीय प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकतील, असा विश्वास UBS Group AG ला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका नोटनुसार, बर्नस्टीनला चिनी बाजारपेठेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. २०२३ मध्ये चार वर्षांची विक्रमी घसरण थांबवल्यानंतर हाँगकाँग-सूचीबद्ध चिनी स्टॉक्सचा गेज, हँग सेंग चायना एंटरप्राइजेस इंडेक्स आधीच सुमारे १३ टक्के खाली आहेत. तर भारताचे बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड उच्च पातळीजवळ व्यवहार करीत आहेत. लंडनस्थित थिंक-टँक ऑफिशियल मॉनेटरी अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स फोरमच्या अलीकडील अभ्यासानुसार, २०२३ मध्ये परदेशी फंड भारतीय इक्विटीमध्ये २१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहेत, ज्यामुळे देशाच्या बेंचमार्क S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकाला सलग आठव्या वर्षी फायदा झाल्याचे आढळले.