दीपक फर्टिलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएसई कोड ५००६४५)
प्रवर्तक: शैलेश मेहता
बाजारभाव: रु. ५९९ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : खते आणि रसायने
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२६.२४ कोटी
प्रवर्तक
४५.४६
परदेशी गुंतवणूकदार
१९.०९
बँकस्/ म्युच्युअल फंड/ सरकार
२.१३
इतर/ जनता
३३.३२
पुस्तकी मूल्य: रु. ४०१ /-
दर्शनी मूल्य: रु. १० /-
गतवर्षीचा लाभांश: ९० %
प्रति समभाग उत्पन्न: रु. ९५.९
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ६.२६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २५.८
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २६.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.७३
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १०.३
बीटा: १
बाजार भांडवल: रु. ७५६९ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १०६२/५१२
वर्ष १९७९ मध्ये स्थापन झालेली दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी शेतीचे निदान आणि उपायांसह अमोनियम नायट्रेट आणि मूल्यवर्धित गृहनिर्माण क्षेत्रातील उत्पादनांसह खते आणि औद्योगिक रसायनांची मुख्य उत्पादक आहे. कंपनीच्या उत्पादनात होम इंटिरिअर्स आणि डिझाइनसाठी भारतातील पहिले आणि सर्वात मोठे संकल्पना रिटेल डेस्टिनेशन समाविष्ट आहे. कंपनी क्लाउड कंप्युटिंग, प्रक्रिया ऑटोमेशन, मोबाइल ॲप्स, युनिफाइड कम्युनिकेशन आणि सहयोग साधनांमध्येही गुंतवणूक करत आहे.
कंपनीच्या प्रमुख उत्पादनांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.
औद्योगिक रसायने: केंद्रित नायट्रिक ऍसिड, आयसो प्रोपिल अल्कोहोल, डायल्युट नायट्रिक ऍसिड, फूड ग्रेड लिक्विड कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनॉल. देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी, डीएफपीसीएल अमोनिया आणि आयपीए आयात आणि पुरवठा करते. हे फार्मास्युटिकल, शाई आणि कोटिंग्ज, सौंदर्यप्रसाधने आणि कृषी रसायन उद्योगाची पूर्तता करते. टेक्निकल अमोनियम नायट्रेटची उत्पादक आहे आणि भारतातील स्फोटक कमी तीव्रतेच्या पोरस प्रिल्ड अमोनियम नायट्रेटची एकमेव उत्पादक आहे.
आणखी वाचा- १९ वर्षांनंतर टाटांचा IPO येणार, शेअर्स खरेदीसाठी गर्दी, ग्रे मार्केटमध्ये दर गगनाला भिडले
पीक पोषण: कंपनी, महाधन या प्रमुख नाममुद्रेअंतर्गत, विशेष आणि पाण्यात विरघळणारी खते तयार करते. कंपनीची जवळपास ५० विविध उत्पादनांची बास्केट असून त्यात मोठ्या प्रमाणात खते, विशेष खते, पाण्यात विरघळणारी खते, सूक्ष्म पोषक आणि दुय्यम पोषक इत्यादींचा समावेश आहे. कंपनी ही भारतातील नायट्रो फॉस्फेटची एकमेव उत्पादक आहे.
‘क्रिएटीसिटी’ हे पुण्याचे क्रिएटिव्ह लिव्हिंग कॅम्पस आहे आणि घर आणि आतील वस्तू, खाद्यपदार्थ आणि पेय आणि भिन्न मनोरंजन क्षेत्रातील भारतातील पहिले आणि सर्वात मोठे गंतव्यस्थान आहे.
दीपक फर्टिलायझर्सचे तळोजा, दहेज, श्रीकाकुलम आणि पानिपत येथे औद्योगिक रसायने उत्पादनाचे (वार्षिक उत्पादन १३.६२ लाख मेट्रिक टन) प्रकल्प असून या खेरीज टेक्निकल अमोनियम नायट्रेट (वार्षिक उत्पादन ४.८७ लाख मेट्रिक टन), पीक पोषण (वार्षिक उत्पादन ११.८६ लाख मेट्रिक टन) स्थापित क्षमता असलेले उत्पादन केंद्र आहेत. कंपनी टेक्निकल अमोनियम नायट्रेटची वार्षिक उत्पादन क्षमता २,२०१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ८.६२ लाख मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
आणखी वाचा-माझा पोर्टफोलिओ : पोर्टफोलिओचा दुसरा त्रैमासिक आढावा – २०२३
मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने उलाढालीत ४८ टक्के वाढ साध्य करून ती ११,३०० कोटींवर नेली आहे. तर नक्त नफ्यात ७८ टक्के वाढ होऊन तो १,२१० कोटींवर गेला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत देखील कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने क्रॉपटेक कांदा, क्रॉपटेक ऊस, क्रॉपटेक कापूस, तीन पीक विशिष्ट ग्रेडसह क्रॉप न्यूट्रिएंट सोल्युशन नाममुद्रा क्रॉपटेक सादर केली आणि फर्टिगेशनसाठी क्रॉप स्पेसिफिक आणि स्टेज स्पेसिफिक ब्रँड सॉलुटेक सादर केले. तसेच हॉस्पिटल सेगमेंटमध्ये निर्जंतुकीकरण उपायांसाठी ८ भिन्न उत्पादने आणली आहेत. कंपनीच्या उत्पादनांची वाढती मागणी तसेच ४,३५० कोटींचा अमोनिया उत्पादन क्षमता वाढीचा प्रकल्प (वार्षिक ६,२८,७०० मेट्रिक टन) याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होईल. सध्या ६०० रुपयांच्या आसपास असलेला हा समभाग मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com