इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत बाजारात पुन्हा खरेदी पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये तेजी आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे ३५० अंकांची वाढ दर्शवली असून, तो ६६,४२४.८६ वर व्यवहार करीत आहे. तर निफ्टी देखील १०० अंकांनी वाढून १९८०० च्या जवळपास पोहोचला आहे. आजच्या व्यवसायात जवळपास प्रत्येक क्षेत्रात खरेदी होताना दिसत आहे. निफ्टीवर बँक, फायनान्शिअल, आयटी, मेटल, एफएमसीजी, ऑटो, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करीत आहेत. सध्या सेन्सेक्स ३५९ अंकांनी वधारत असून, तो ६६४३८ च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. तर निफ्टी ९९ अंकांनी वाढून १९,७८९ च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. सेन्सेक्स ३० मधील २९ समभाग हिरव्या रंगात व्यवहार करीत आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये ICICIBANK, LT, AXISBANK, WIPRO, TATAMOTORS, BAJFINANCE यांचा समावेश आहे.

हेही वाचाः हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये मुकेश अंबानींचे वर्चस्व कायम, अदाणींना मागे टाकत गाठलं ‘हे’ स्थान

विशेष म्हणजे मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५६६.९७ अंशांनी वधारून तो ६६,०७९.३६ पातळीवर बंद झाला होता. निर्देशांकाने ४०० अंश तेजीसह व्यवहाराला सुरुवात केली होती आणि सत्रात त्याने ६६,१८०.१७ अंश अशी सत्रातील उच्चांकी झेप घेतली होती. दुसरीकडे कोल इंडिया, अदाणी पोर्ट्स आणि भारती एअरटेलच्या समभागांमध्ये आलेल्या तेजीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १७७.५० अंशांची भर घातली होती. काल तो १९,६८९.८५ पातळीवर स्थिरावला होता.

हेही वाचाः बँक ऑफ बडोदाचे सणासुदीच्या काळात ग्राहकांना गिफ्ट, FD वर व्याजदरात केली वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याने तेल उत्पादक आखाती क्षेत्रात व्यापक संघर्षाची भीती निर्माण केल्यामुळे शेअर बाजारांमध्ये झपाट्याने घसरण झाली होती.परंतु आता पुन्हा शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. खनिज तेलाच्या किमतीतील नरमाई आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर स्थिर ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांच्या टिप्पणींनी जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.