Adani Group Moodys Ratings: अदाणी समूह आणि समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्या अडचणीत कमी होत नाहीत. मागच्या वर्षी हिंडेनबर्ग अहवाल आणि त्यानंतर आता अमेरिकेत भ्रष्टाचार प्रकरणात खटला दाखल झाल्यानंतर अदाणी समूहाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पतमानांकन संस्था मुडीजने अदाणी समूहाच्या सात कंपन्यांचे रेटिंग कमी केले आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, मुडीजने अदाणी एंटप्राइजेस, अदाणी एनर्जी, अदाणी ग्रीन एनर्जी यांच्यासह सात कंपन्यांचे रेटिंग कमी करून त्यांना नकारात्मक शेरा दिला आहे.

मूडीज संस्थेने नकारात्मक शेरा दिलेल्या अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये अदाणी एंटप्राइजेस, अदाणी एनर्जी, अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, अदाणी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्र लिमिटेड आणि अदाणी आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रर्मिनल या कंपन्यांचे मानांकन घटविले असून त्यांना नकारात्मक शेरा दिला आहे.

हे वाचा >> अदानींसमोर अटकेचे आव्हान; चौकशीसाठी अमेरिकेत प्रत्यार्पण शक्य; विरोधकांचे केंद्रावर टीकास्त्र

याआधी स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) या पतमानांकन संस्थेनेही अदाणी कंपनीचे मानांकन कमी केले होते. एस अँड पीने अदाणी पोर्ट्स, अदाणी ग्रीन यांच्यासह तीन कंपन्यांचे मानांकन उणे केले होते. पतमानांकन संस्थांकडून ‘रेटिंग’ देताना A, B, C सारखी मूळाक्षरांचा श्रेणीरूपात वापर केला जातो. त्यातदेखील उणे आणि अधिक दर्शविले जाते. एस अँड पीने अदाणी कंपनीला BBB- ‘बीबीबी उणे‌‌’ या कनिष्ठ श्रेणीतील मानांकन दिले होते.

लाचखोरी प्रकरण भोवले

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) उद्याोगपती गौतम अदानी आणि सागर अदानी यांना लाचखोरीप्रकरणी समन्स बजावले आहे. भारतामधील काही राज्यांमध्ये सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर (२,२०० कोटी रुपये) लाचेपोटी दिल्याचा अदानी यांच्यावर आरोप आहे. अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने गौतम अदानी, सागर अदानी यांच्यासह अन्य सहा जणांवर लाचखोरीचा आरोप ठेवला आहे. त्याच्या जोडीला ‘एसईसी’ने या अदानी काका-पुतण्यावर आणि अज्योर पॉवर ग्लोबलचे कार्यकारी अधिकारी सिरील कॅबेन्स यांच्यावर आरोप ठेवले आहे. अदानी समूहाने अमेरिकी फर्मसह अन्य गुंतवणूकदारांकडून कर्ज आणि रोख्यांच्या स्वरूपात दोन अब्ज डॉलर उभे केले. त्यासाठी त्यांनी या फर्मच्या लाचखोरीविरोधी धोरणांशी संबंधित खोटे व दिशाभूल करणारे विवरणपत्रे वापरली असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुडीच संस्था काय आहे?

जागतिक स्तरावर तीन मुख्य मान्यताप्राप्त पतमानांकन संस्था म्हणजेच क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत. यामध्ये मूडीज, स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) आणि फिच यांचा समावेश होतो. मूडीज सर्वात जुनी संस्था असून तिची स्थापना १९०० साली झाली. पहिल्या महायुद्धाच्या अगदी आधी तिचे पहिले सार्वभौम पतमानांकन प्रसिद्ध झाले.