फोर्टीस हेल्थकेअरचा निधी दुसरीकडे वळवल्याप्रकरणी चार कंपन्यांना भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने नोटीस बजावली आहे. या कंपन्यांनी ४ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड १५ दिवसांत जमा करावा, असे सेबीने बजावले आहे. सेबीकडून फोर्टीस ग्लोबल हेल्थकेअर, आरएचसी फायनान्स, शिमल हेल्थकेअर आणि एएनआर सिक्युरिटीज या कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

सेबीने ९ जूनला या नोटिसा बजावल्या आहेत. या चार कंपन्यांनी व्याज आणि वसुलीचा खर्च असे मिळून ४ कोटी ५६ लाख रुपये १५ दिवसांत जमा करावेत, असे नोटिशीत म्हटले आहे. कंपन्या यात अपयशी ठरल्यास त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. याचबरोबर त्यांच्या बँक खाती गोठवली जाणार आहेत. सेबीने या कंपन्यांना मे २०२० मध्ये या प्रकरणी दंड ठोठावला होता.

हेही वाचाः मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८५.३५ अंशांनी वधारून ६३,२२८.५१ पातळीवर बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्टीस हेल्थकेअर लिमिटेडमधून आरएचसी होल्डिंग या कंपनीत ३९७ कोटी रुपये वळवण्यात आले होते. ही रक्कम फोर्टीस हेल्थकेअरची उपकंपनी फोर्टीस हॉस्पिटल्स लिमिटेडच्या माधम्यातून वळवण्यात आली होती. यासाठी अनेक कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. फोर्टीस हेल्थकेअर लिमिटेडचा निधी दुसरीकडे वळवून गैरव्यवहार लपवण्यासाठी चुकीची माहिती माहिती सादर केल्याप्रकरणी सेबीने ३२ कंपन्यांना ३८.७५ कोटी रुपयांचा दंड केला होता. त्यात या चार कंपन्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

हेही वाचाः WPI Inflation: घाऊक महागाईचा दर तीन वर्षांच्या नीचांकावर