भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने सोमवारी इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) नावाची नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा ग्राहकांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून बँक एटीएममधून पैसे काढण्यास परवानगी देणार आहे. बँक ऑफ बडोदा ही सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे, जी ही सुविधा केवळ त्यांच्या ग्राहकांनाच नाही, तर BHIM UPI आणि इतर अॅप्लिकेशन्स वापरणाऱ्या इतर बँकांच्या ग्राहकांनाही उपलब्ध करून देत आहे. जे ग्राहक मोबाईल फोनवर इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) साठी सक्षम असलेले कोणतेही UPI ऍप्लिकेशन वापरतात, त्यांना डेबिट कार्डाची गरज नसताना बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

हेही वाचाः Ashish Deora Success Story : हार्वर्डच्या माजी विद्यार्थ्यानं रतन टाटांशी संबंधित कंपनी अवघ्या ९० कोटींना विकत घेतली, कोण आहेत आशिष देवरा?

कसे काढायचे पैसे?

या सेवेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मशीनवर UPI रोख काढण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मशीनमध्ये पैसे काढायची रक्कम टाकल्यानंतर एटीएम मशीनवर क्यू आर कोड दिसेल. इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) असलेले कोणतेही UPI ऍप्लिकेशन वापरल्यास आपल्याला पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे.

हेही वाचाः २०२३-२०३० दरम्यान भारताची अर्थव्यवस्था २०१० नंतरच्या सर्वात मजबूत वाढीच्या टप्प्यावर : नोमुरा सिक्युरिटीज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ हजार रुपयांपर्यंत मर्यादा असणार

इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सेवा वापरून ग्राहकांना कार्डशिवाय पैसे काढण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर ग्राहक एका दिवसांत दोनदा व्यवहार करू शकतात. तसेच एका वेळेस जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढू शकता.