चालू वर्षाची सुरुवातच निफ्टीने १८,६०४ या उच्चांकापासून २० डिसेंबरच्या १६,४१० च्या मंदीच्या दाहक घसरणीतून झाली. या मंदीमुळे कोमेजलेल्या मनावर हळुवार फुंकर ही ३ जानेवारीच्या ‘ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी’ आणि १० जानेवारीच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या लेखातून केले. १० जानेवारीच्या लेखात ‘भूमिती श्रेणीचा’ विस्तृत आढावा घेत निफ्टी निर्देशांकाचे १८,३०० हे वरचे लक्ष्य असेल असे सूचित केले होते. यातील दोन ओळीमधील अर्थ म्हणजे हे वरील लक्ष्य अतिशय संथ गतीने साध्य झाल पाहिजे. अन्यथा ‘अतिघाई संकटात नेई’ जर निफ्टीनिर्देशांकाच वरच लक्ष्य अतिजलद गतीने साध्य झाल्यास आपण ???????

हेही वाचा- लक्ष्मीची पाऊले : मोठी त्याची सावली

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

पुन्हा घातक उतारांना सामोरे जावे लागेल आणि तसेच घडले. २० डिसेंबर २०२१ ला निफ्टी निर्देशांक १६,४१० या पातळीवरून १८ जानेवारीला १८,३५० हा उच्चांक २१ दिवसांत अतिजलद गतीने साध्य झाला, जो पुढे घातक उतारास कारणीभूत ठरला. निफ्टी निर्देशांक १८,३५० पातळीवरून अवघ्या ३२ दिवसांत ७ मार्चला निफ्टी निर्देशांकांनी १५,७११ ही नीचांकी पातळी गाठली. या घातक उताराची कल्पना ३१ जानेवारीच्या ‘अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येवर’ या लेखात बाजाराला अर्थसंकल्प निराशादायक वाटला, तर निफ्टी निर्देशांक १५,५०० पर्यंत खाली घसरू शकतो, अस नमूद केले होते.

७ मार्चला निफ्टी निर्देशांकांनी १५,७११ हा नीचांक नोंदवल्यावर येणाऱ्या दिवसातील निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक हा १८,०९० असेल, असे भाकीत १४ मार्चच्या ‘साथ लाभेल का’ या लेखात केले होते. आणि ४ एप्रिलला निफ्टी निर्देशांकांनी १८,११४ चा उच्चांकाला स्पर्श करत वरचे लक्ष्य साध्य केले.‘डाऊ संकल्पनेचा’आधार घेत ही मंदी एक वर्ष चालण्याची शक्यता असल्यामुळे तेजीनंतर लगेचच मंदीची मानसिक, आर्थिक तयारीची नितांत गरज असते. कारण समभागाची वेळीच नफारूपी विक्री केली नाही तर नफ्याचे बाष्पीभवन होऊन मुद्दलातच खोट येत असल्याने वाचकांना वेळीच सावध करण्याची गरज असते. त्या दृष्टीने ३० मे च्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या लेखात निफ्टी निर्देशांक १५,५५० पातळीपर्यंत खाली घसरू शकतो याचे सूतोवाच केले. दुर्दैवाने तसेच घडले आणि निफ्टी निर्देशांकांनी १७ जूनला १५,१८३ चा नीचांक नोंदवला. या मंदीच्या दणक्यातून सावरण्यासाठी ‘तांत्रिक विश्लेषण’ शास्त्रातील ‘गँन’ कालमापन पद्धतीचा १२ आठवड्यांच्या चक्राचा (गँन ट्वेल वीक सायकल) आधार घेत, आता निफ्टी निर्देशांकांनी नीचांक प्रस्थापित केल्याने निफ्टी निर्देशांक उभारी घेण्याची आशा होती. त्यानुसार उभारी घेत निफ्टी निर्देशांकांनी १८,८८७ पातळीचा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला. या उच्चांकाची कल्पना १४ नोव्हेंबरच्या ‘आकाश-आभाळ’ या लेखात दिली होती. अशा रीतीने या वर्षारंभापासून अखेरीपर्यंतच्या निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा ‘सिंहावलोकन – कभी खुशी – कभी गम!’ या न्यायाने आढावा घेतला.

हेही वाचा- CIBIL Score म्हणजे काय? तो मोजायच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

येणाऱ्या दिवसातील निफ्टी निर्देशांकाची वाटचाल:

सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकाच्या १८,४०० ते १८,६०० च्या परिघाला (बॅण्ड) अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. किंबहुना हा तेजी अथवा मंदीचा वळणबिंदू (टर्निंग पाॅइंट) आहे. निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,६०० पार करण्यास आणि १८,४०० स्तर राखण्यास अपयशी ठरत असल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १८,१०० या पातळीपासून उणे ३०० अंश म्हणजे १७,८०० असेल. जे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी साध्य झाले आहे.येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकांनी सातत्याने १७,८०० ची पातळी (दिवसांतर्गत २०० अंशांची घसरण गृहीत धरत) सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकावर क्षीण सुधारणा संभवते, जिचे वरचे लक्ष्य १८,१०० ते १८,३०० ते १८,४०० असेल. निफ्टी निर्देशांक १८,४०० ते १८,६०० अंशांची पातळी पार करण्यास सातत्याने अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे १७,५०० ते १७,२०० हे खालचे लक्ष्य गृहीत धरावे.

हेही वाचा- पीपीएफ खात्याची मुदत किती वेळा वाढवता येते? जाणून घ्या याचे नियम

शिंपल्यातील मोती

हे सदर दीर्घमुदतीच्या (गुंतवणूक कालावधी किमान ३ ते ५ वर्षे) गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण आणि त्याद्वारे निवृत्तीनंतरच्या पैशाची तरतूद नजरेसमोर ठेवत या सदराची मांडणी केलेली आहे. दीर्घमुदतीच्या कालावधीत बाजारात घातक उतार गृहीत धरून, बाजारात आणि समभागात जेव्हा मंदी येईल, तेव्हाच हे समभाग नमूद केलेल्या पडेल भावात खरेदी करणे हितावह आहे. गुंतवणूकयोग्य रक्कम एकरकमी न गुंतवता वीस टक्क्यांच्या पाच तुकड्यांत विभागून दीर्घमुदती करता खरेदी करावे. हे सूत्र वापरून सरलेल्या सप्ताहातील मंदीच्या दणक्यात हे समभाग गुंतवणूकदारांना स्वस्तात मिळाले का याचा आढावा घेऊया.

– ७ नोव्हेंबरच्या सदरात सुचविलेला ‘आनंद राठी वेल्थ लिमिटेड’ या समभागाबद्दल : बाजारात आणि समभागात जेव्हा मंदी येईल, तेव्हा हा समभाग ६७० ते ६३५ रुपयांच्या दरम्यान खरेदीचा विचार करावा. २३ डिसेंबरचा समभागाचा बंद भाव : ६६३ रुपये.

– १४ नोव्हेंबरच्या लेखातील रेणुका शुगर समभागात जेव्हा मंदी येईल, तेव्हा हा समभाग ५० ते ५३ रुपयांच्या दरम्यान विचार करावा असे सुचविले होते २३ डिसेंबरचा बंद भाव: ५०.७५ रुपये.

– २० नोव्हेंबरच्या लेखातील संवर्धन मदरसन सुमी बाजारात हा समभाग ६५ ते ७० रुपयांच्या दरम्यान खरेदी करावा असे सांगितले होते. गेल्या शुक्रवारी म्हणजेच २३ डिसेंबरचा बंद भाव : ६६.९० रुपये.

– २७ नोव्हेंबरच्या लेखातील एलआयसीचा समभाग ५८० ते ७२५ रुपयांच्या दरम्यान खरेदीचा विचार करावा, २३ डिसेंबरचा बंद भाव: ६५८ रुपये.

– ३ डिसेंबरच्या लेखातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे मंदीप्रवण क्षेत्र म्हणूनच अधोरेखित केल्याने यातील ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड’चा समभाग ३,६०० ते ३,९०० च्या परिघात आहे. २३ डिसेंबरचा बंद भाव : ३,८३४ रुपये.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com