केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारे काही महिने चांगले असू शकतात. ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्याची भेट मिळाल्यानंतर आता बहुप्रतीक्षित तारीख पुढील डीए वाढीची असेल. कारण यामुळे खूप बदल होण्याची शक्यता आहे. येणारे नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी चांगले ठरू शकते. विशेषत: महागाई भत्त्या(Dearness allowance)च्या आघाडीवर चांगली बातमी वाट पाहत आहे. १ जुलै २०२३ पासून कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी २०२४ मध्ये महागाई भत्त्यात पुन्हा सुधारणा केली जाणार आहे. हे मोजण्याचे आकडेही आता येऊ लागले आहेत. असे मानले जात आहे की, महागाई भत्त्यात पुढील वाढ खूप मोठी असू शकते.

महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढू शकतो

महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी ५ टक्के वाढ होऊ शकते. एआयसीपीआय निर्देशांकाने निर्धारित केलेला डीए स्कोअर असेच काहीतरी सूचित करतो. सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची मोठी झेप ठरणार आहे. AICPI निर्देशांकावरून महागाई भत्ता मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते.

सध्याची परिस्थिती काय आहे?

जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी AICPI निर्देशांक जाहीर केले आहेत. सध्या निर्देशांक १३७.५ अंकांवर आहे, तर महागाई भत्ता स्कोअर ४८.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा ४९ टक्क्यांहून अधिक होईल, असा अंदाज आहे. त्यानंतरही नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी येणे बाकी आहे. डिसेंबर २०२३ चे AICPI निर्देशांक आल्यानंतरच एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार

सातव्या वेतन आयोगा(7th Pay Commission)अंतर्गत AICPI क्रमांक जुलै ते डिसेंबर २०२३ पर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता ४८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. ३ महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत. त्यात आणखी २.५० टक्क्यांची झेप दिसू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे पूर्णपणे निर्देशांकाच्या गणनेवर अवलंबून असेल. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर (DA calculator) उर्वरित महिन्यांत महागाई भत्ता ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे संकेत आहेत.