गेल्या २-३ वर्षांत सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांची भरभराट केली असली, तरीही संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड आणि शेअरबाजारातील गुंतवणूक उपयोगी ठरते. हे एव्हाना सर्व सामान्य गुंतवणूकदारांनाही कळून चुकले आहे. गुंतवणुकीचा मुख्य उद्देश संपत्ती निर्माण करणे हा असतो. सोने आणि चांदीच्या भावात इतकी मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण सध्याची जागतिक परिस्थिति आहे. युद्धजन्य परिस्थिति असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे देशा-देशांतील तणाव वाढून देशांतर्गत स्थितीही आव्हानात्मक बनत चालली आहे.

या जागतिक परिस्थितीचा भारतातील उद्योग, उत्पादन, आयात- निर्यात, परदेशी गुंतवणूक, ढासळता रुपया, वित्तीय तूट आणि महागाई यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. भारतासारख्या विकसनशील देशांत वाढती वित्तीय तूट आटोक्यात ठेवून विकासाची गती वाढवणे, हे आव्हानात्मक आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिति आणि सरकारची धोरणे पाहता विकासाच्या क्षेत्रातील केवळ उत्तम कंपन्या निवडून केलेली दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरेल. अर्थात दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे एकदा गुंतवणूक करून विसरून जाणे नव्हे, हे ही लक्षात घ्यायला हवे. बदलते तंत्रज्ञान, सरकारी धोरणे, जागतिक परिस्थिति आणि नवीन जीवनशैली याचा विचार करून, पोर्टफोलियोचा वेळोवेळी आढावा घेणे जरूरी असते.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केमिकल, फार्मा, एफएमसीजी, टेक्नॉलजी, इनफ्रास्ट्रक्चर, बँकिंग आणि डिफेन्स ही क्षेत्र योग्य वाटतात. या लेखांत किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी १० कंपन्यांचे शेअर गुंतवणुकीसाठी सुचवत आहे. अर्थात सध्याच्या काळात कमी जोखीम असलेल्या कंपन्या निवडून हे शेअर सुचवले आहेत. मुहूर्ताला सुरुवात करून नंतर टप्याटप्याने खरेदी केल्यास नफ्याचे प्रमाण वाढू शकेल. तसेच जोखीमही कमी होऊ शकेल. शिफारस केलेल्या कंपन्यांच्या शेअरऐवजी त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांचाही विचार करावा. गुंतवणूकदारांनी स्वतःच्या जोखमीवर स्वतंत्र संशोधन आणि अभ्यास करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

दिवाळीची खरेदी

गेल्या २-३ वर्षांत सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांची भरभराट केली असली तरीही संपत्ती निर्माण करण्यासाठी म्यूचुअल फंड आणि शेअरबाजारातील गुंतवणूक उपयोगी ठरते हे एव्हानासर्व सामान्य गुंतवणूकदारांनाही कळून चुकले आहे. गुंतवणुकीचा मुख्य उद्देश ‘संपत्ती निर्माण करणे’ असतो. सोने आणि चांदीच्या भावातइतकी मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण सध्याची जागतिक परिस्थिति आहे. युद्धजन्य परिस्थिति असतानाच ट्रम्पनीतीने देशा देशांतील तणाव वाढून देशांतर्गत स्थितीहि आव्हानात्मक बनत चालली आहे.

या जागतिक परिस्थितीचा भारतातील उद्योग, उत्पादन, आयात- निर्यात,परदेशी गुंतवणूक, ढासळता रुपया, वित्तीय तूट आणि चलनवाढ यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.भारतासारख्या विकसनशील देशांत वाढती वित्तीय तूट आटोक्यात ठेवून विकासाची गती वाढवणे हे आव्हानात्मक आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिति आणि सरकारची धोरणे पाहता विकासाच्या क्षेत्रातील केवळ उत्तम कंपन्या निवडून केलेली दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरेल. अर्थात दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे एकदा गुंतवणूक करून विसरून जाणे नव्हे, हे ही लक्षात घ्यायला हवे. बदलते तंत्रज्ञान, सरकारी धोरणे, जागतिक परिस्थिति आणि नवीन जीवनशैली याचा विचार करून, पोर्टफोलियोचा वेळोवेळी आढावा घेणे जरूरी असते.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केमिकल्स, फार्मा, एफएमसीजी, टेक्नॉलजी, इनफ्रास्ट्रक्चर, बँकिंग आणिसंरक्षण ही क्षेत्र योग्य वाटतात. या लेखांत किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी १० कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी सुचवत आहे. अर्थात सध्याच्या काळात कमी जोखीम असलेल्या कंपन्या निवडून हे शेअर्स सुचवले आहेत. मुहूर्तालासुरवात करून नंतर टप्याटप्यात खरेदी केल्यास नफ्याचे प्रमाण वाढू शकेल तसेच जोखीमही कमी होऊ शकेल. शिफारस केलेल्या कंपन्यांच्या शेअर्स ऐवजी त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांचाही विचार करावा.  गुंतवणूकदारांनी  स्वतःच्या जोखमीवर आणि स्वतंत्र संशोधन व अभ्यास करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.