सीए डॉ दिलीप सातभाई

गेल्या काही वर्षी ही सवलत नवीन प्रणाली साठी उपलब्ध नव्हती. मात्र त्यात बदल होऊन ही कर सवलत आता नवीन कर प्रणाली लोकप्रिय होण्यासाठी उपलब्ध झाली आहे.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?

कर सवलत नवीन वा जुन्या कर प्रणालीत समान

प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ८७ए अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ (आकारणी वर्ष २०२४-२५) साठी १२५०० रुपये ही कमाल कर सवलत जुन्या आणि नवीन दोन्ही कर प्रणालीसाठी उपलब्ध आहे. जर करपात्र उत्पन्नावर रुपये १२,५०० किंवा त्यापेक्षा कमी प्राप्तीकर आल्यास सदर कर सवलत सदर प्राप्तीकराच्या देयतेइतकीच मर्यादित राहते तर उर्वरीत कर सवलत पुढील वर्षासाठी ओढली जाऊ शकत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षी ही सवलत नवीन प्रणाली साठी उपलब्ध नव्हती.

मात्र त्यात बदल होऊन ही कर सवलत आता नवीन कर प्रणाली लोकप्रिय होण्यासाठी उपलब्ध झाली आहे. या कर सवलतीमुळे व्यक्तीचे उत्पन्न करपात्र रक्कमेच्या म्हणजे जुन्या प्रणालीत रुपये अडीच लाख रुपयांच्या पेक्षा जरी अधिक झाल्यास किंवा नवीन कर प्रणालीत रुपये तीन लाखापेक्षा जरी अधिक झाल्यास प्राप्तिकर द्यावा लागत नाही. तथापि सदर करदात्याचे करपात्र उत्पन्न जर जुन्या प्रणालीतील ढोबळ उत्पन्न रुपये पाच लाख रुपयांपर्यंत व नवीन कर प्रणालीत ते रुपये सात लाख रुपयांपर्यंत असल्यास !

सर्व सरसकट उत्पन्नांसाठी ही कर सवलत उपलब्ध नाही

सर्व व्यक्ती त्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पन्नांसाठी या कर सवलतीचा हक्क सांगू शकत नाही तर काही उत्पन्नाच्या बाबतील ती कर सवलत उपलब्ध नाही हे अनेक करदात्यांना आजही माहिती नाही. याखेरीज जर करदात्याचे उत्पन्न या मर्यादेच्या बाहेर गेल्यास कर सवलत मिळत नाही हे अजूनही अनेक करदात्यांना उमजत नाही. याखेरीज तथापि, सर्व करपात्र उत्पन्नांसाठी सरसकट या कर सवलतीचा फायदा घेता येत नाही हे ही महत्वाचे ! तर काही व्यवहारांवर विशिष्ट दराने कर आकारला जातो आणि म्हणून कलम ८७ए कर सवलतीसाठी प्रतिबंध केला आहे.

कोणत्या करदात्यास ही कर सवलत उपलब्ध आहे?

१. प्राप्तिकर कायद्यानुसार, कलम ८७ए अंतर्गत कर सवलत फक्त भारतीय निवासी व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.

२. अनिवासी व्यक्ती (एनआरआय) सामान्यत: निवासी व्यक्ती (आरएनओआर ) यांना ही कर सवलत उपलब्ध नाही.

३. हिंदू अविभक्त कुटुंबे (एचयुएफ) कलम ८७ए अंतर्गत सवलतीसाठी पात्र नाहीत.

४. शेड्युल व्ही.आय. मधील म्हणजे कलम ८० अंतर्गत असणारी उत्पन्नातून मिळणारी सर्व पात्र वजावटीची रक्कम वजा जाता राहिलेली रक्कम जुन्या कर प्रणालीत कर पात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास नवीन प्रणालीत कर पात्र उत्पन्न रुपये सात लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास ही कर सवलत मिळेल.

कलम ८७ए अंतर्गत कर सवलत मिळण्यास पात्र असणारे/नसणारे उत्पन्न

एखाद्या व्यक्तीला इक्विटी शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंड आणि विशिष्ट विशिष्ट उत्पन्नातून दीर्घकालीन भांडवली नफा असल्यास कलम ८७ए अंतर्गत कर सवलत उपलब्ध नाही. त्याची विगतवारी खालील प्रमाणे आहे.

१. इक्विटी शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतून मिळालेला दीर्घ कालीन भांडवली नफा

प्राप्तिकर कायद्याच्या कलम ११२ए अंतर्गत इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांच्या विक्रीतून उद्भवणारा दीर्घकालीन भांडवली नफा एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास अधिकची उर्वरीत रक्कम १०% दराने करपात्र असते, तर एक लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली नफ्याला करातून संपूर्ण सूट मिळते. एखाद्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नामध्ये कलम ११२ए अंतर्गत सूचीबद्ध इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाच्या युनिट्सच्या विक्रीतून कोणताही दीर्घकालीन भांडवली नफा समाविष्ट असल्यास कलम ८७ए अंतर्गत मिळणारी कर सवलत अशा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर देय करावर उपलब्ध होत नाही. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न कलम ८७ए अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र असेल, परंतु त्याला इक्विटी म्युच्युअल फंड किंवा लिस्टेड इक्विटी शेअर्समधून दीर्घकालीन भांडवली नफ्याद्वारे उत्पन्न असेल, तर अशा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १०% विशेष कर दर ८७ए अंतर्गत सूट विचारात न घेता अशा करावर देय असेल.

हेही वाचा… Money Mantra : मोदी सरकारने पीपीएफसह ‘या’ योजनांचे नियम बदलले, मोठा दिलासा मिळाला

उदाहरण १: नेहाचे निव्वळ करपात्र वेतन वर्षाला ३.३ लाख रुपये आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या विक्रीतून दीर्घकालीन भांडवली नफा रुपये १.१० लाख आहे. येथे, नेहा १०,००० रुपयांच्या अशा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १०% दराने कर भरण्यास जबाबदार आहे आणि उपकर @ ४% एकूण एकूण रु. १०४० देय आहेत. निव्वळ करपात्र पगाराच्या उत्पन्नावर देय कर हा कलम ८७ए नुसार प्रदान केलेल्या किमान रक्कमेपेक्षा कमी असल्याने, अशा पगाराच्या उत्पन्नावरील कराची संपूर्ण रक्कम सवलत/s ८७ए साठी पात्र असेल आणि अशा प्रकारे, व्यक्ती वर सांगितल्याप्रमाणे फक्त रु. १०४० च्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर उत्पन्न होणारा कर भरावा लागेल.

२. विशेष उत्पन्न

प्राप्तीकर कायद्यात विषद केलेले काही उत्पन्न असे आहेत की ज्यांवर प्राप्तिकर कराच्या गटवारीऐवजी विशिष्ट ठराविक दराने कर आकारला जातो. त्यात जुगारातून मिळालेले, आभासी मालमत्ता विक्रीतून वा हस्तांतरणाने मिळालेलं (व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता), ऑनलाइन गेमिंग मधून मिळालेले, लॉटरी लागल्याने मिळालेले बक्षीस, गेम शो किंवा सट्टेबाजीतून मिळालेले उत्पन्न कलम ८७ए अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र नाहीत. या उत्पन्नावर उपकर आणि अधिभार (लागू असल्यास) सोबत ३०% सरसकट (फ्लॅट) दराने कर आकारला जातो.

३. तुमचा इतर भांडवली नफा असेल तर?

वर म्हटल्याप्रमाणे, इक्विटी शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडांकडील दीर्घ कालीन भांडवली नफा कलम ८७ए प्राप्तिकर सवलतीसाठी पात्र नाहीत. तथापि, अशी शक्यता असू शकते की सदर व्यक्तीला अचल मालमत्ता विकून (रिअल इस्टेट), किंवा असूचीबद्ध शेअर्स यांसारख्या इतर मालमत्तेतून अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफा झाला असेल किंवा इक्विटी शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंडांमधून अल्पकालीन भांडवली नफा असेल अशावेळी प्राप्तिकर कायद्याच्या कलम ११२ए अंतर्गत नमूद केलेल्या मालमत्तेव्यतिरिक्त इतर कोणत्याही मालमत्तेतून उद्भवलेल्या भांडवली नफ्यावर कलम ८७ए अंतर्गत कर सवलत मिळू शकते.

थोडक्यात रिअल इस्टेट, असूचीबद्ध शेअर्स किंवा इतर कोणत्याही मालमत्तेतील दीर्घकालीन भांडवली नफा ८७ए कर सवलतीसाठी पात्र असतील. याखेरीज इक्विटी म्युच्युअल फंड किंवा स्टॉकच्या विक्रीतून उद्भवलेल्या अल्पकालीन भांडवली नफा, जो प्राप्तिकर कायद्याच्या कलम १११ए अंतर्गत करपात्र असेल त्यावरही कर सवलत मिळू शकते. त्यामुळे, जर तुमच्याकडे जमीन, असूचीबद्ध शेअर्स किंवा इतर कोणत्याही भांडवली मालमत्तेच्या विक्रीतून दीर्घकालीन भांडवली नफा किंवा इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून अल्पकालीन भांडवली नफा असेल तर तुम्ही कलम ८७ए अंतर्गत कर सवलती मिळण्यास पात्र आहात

कलम ८७ए अंतर्गत किती व कधी कर सवलत मिळू शकते?

१. कलम ८७ए अंतर्गत कर सवलतीची वजावट मिळण्यासाठी व्यक्तीने प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. स्वतःच कर निर्धारण करून त्यातून उत्पन्न करपात्र असल्याचे स्वयंघोषित केल्यास ही सवलत मिळत नाही. थोडक्यात, कर सवलत स्वयंचलित आधारावर उपलब्ध नाहीये लक्षात घेतले पाहिजे.

२. प्राप्तिकर कायद्यांतर्गत, जर एकूण करपात्र उत्पन्न एखाद्या आर्थिक वर्षात मूलभूत किमान मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि विशिष्ट प्रकरणांमध्ये (टीडीएस आर्थिक वर्षात रु. २५,००० पेक्षा जास्त असेल, परदेश प्रवासावर रु. २ लाख किंवा त्याहून अधिक खर्च केले असेल इ.) प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

३. आर्थिक वर्ष २०२३-२४ (आकारणी वर्ष २०२४-२५) साठी, मूळ कर सवलत मर्यादा एखाद्या व्यक्तीने जुन्या कर प्रणालीची निवड केल्यास त्याच्या वयावर अवलंबून असेल. त्याबरहुकूम ६० वर्षांखालील व्यक्तींसाठी, मूळ सूट मर्यादा २.५० लाख रुपये आहे, ६० वर्षांवरील परंतु ८० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी, सूट मर्यादा ३ लाख रुपये आहे आणि ज्यांचे वय ८० वर्षांहून अधिक आहे त्यांच्यासाठी करमुक्त किमान मर्यादा ५ लाख रुपये आहे.

४. एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना नवीन कर प्रणालीची निवड केली, तर वयाचा विचार न करता म्हणजे कोणत्याही वयाच्या करदात्यास ३ लाख रुपयांची मूळ किमान करमुक्त मर्यादा लागू आहे. रु. ७ लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नासाठी कलम ८७ए अंतर्गत त्यांना कर सवलत लागू होईल.