डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थ क्षेत्रातील योगदानाबद्दल लिहिणे म्हणजे साक्षात देवाची आरती म्हणण्यासारखेच आहे. खरे तर इंद्रप्रसाद गोरधनभाई पटेल या माणसामुळे आजचा आर्थिक दिवस आपण बघू शकतो. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची पहिली पसंती १९७७ ते १९८२ या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी राहिलेल्या आणि त्या वेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून नुकतेच निवृत्त झालेल्या पटेलांना होती. पण त्यांनी डॉ. मनमोहन सिंग या पदाला न्याय देऊ शकतील असे सांगत त्यांना पुढे केले. अर्थात डॉ. सिंग यांचे त्याआधीदेखील देशासाठी मोठे योगदान होतेच. अर्थशास्त्रामधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया होता. त्यांच्या विनयशीलतेमुळे आणि ज्ञानामुळे त्यांना आयुष्यात खूप वेळा देशाची सेवा करण्याची संधी मिळाली त्याचे त्यांनी अक्षरशः सोने केले.

मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत कित्येक निर्णय मैलाचा दगड सिद्ध झाले. यात थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर), आधार, मनरेगा, पोलिओ निर्मुलन, माहितीचा अधिकार, स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ), मल्टिब्रँड रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूक, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा इत्यादी. जेवढे त्यांचे काम होते तेवढीच त्यांच्यावर टीकादेखील झाली. विशेषतः त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. भारतातील भांडवली बाजार, सर्व नियामक आणि त्या संबंधी असणाऱ्या सगळ्या सुधारणांचे जनक हे डॉ. मनमोहन सिंगच आहेत.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

हेही वाचा – Money Mantra: आयुर्विम्याच्या पारंपारिक योजना- टर्म इन्शुरन्स की, एन्डोव्हमेंट अशुरन्स?

हेही वाचा – Money Mantra: आठवड्याअखेरीस विक्रीचा जोर कायम, निफ्टी १९७०० खाली

वर्ष १९९१च्या आर्थिक सुधारणांचा फायदा भारताला सगळ्यात जास्त झाला तो २००० ते २०१० च्या दशकात आणि सुदैवाने त्यातील बराचसा काळ ते स्वतः पंतप्रधानपदी होते. आज अचानक त्यांच्याविषयी लिहिण्याचे कारण म्हणजे २६ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले डॉ. मनमोहन सिंग ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. भारताचा जगभर आर्थिक दबदबा मिळवून देणारे डॉ. मनमोहन सिंग अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकापासून मात्र वंचित राहिले. नोबेल मिळते ते अर्थशास्त्रातील सिद्धांतांना कारण नोबेल कमिटीच्या दृष्टीने अर्थशास्त्र हे अचूक विज्ञान म्हणजे रसायन किंवा भौतिक शास्त्रासारखेच आहे आणि त्यातील सिद्धांत हे सिद्ध करता येऊ शकतात. म्हणून आजपर्यंत कुठल्याही अर्थमंत्र्याला हे मिळाले नाही. याला अपवाद होता गुन्नर मिर्दाल यांचा. पण त्यांनादेखील नोबेल मिळाले ते त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी आणि सिद्धांतासाठी. अर्थशास्त्र जगातल्या शेवटच्या माणसाकडे पोहोचले नाही तर त्याचा काही उपयोग नसतो आणि हे करताना न जाणे किती सिद्धांत मांडावे लागतात, त्यांची कदाचित कुठेही नोंद होत नाही. असो, तीस वर्षांनंतर आजही तो ऐतिहासिक अर्थसंकल्प लक्षात राहतो हेच डॉ. मनमोहन सिंग यांचे नोबेल पारितोषिक! जीवेत शरद: शतम्, जन्मदिनस्य: अन्त:करणस्य शुभेच्छा.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com